गद्दार ज्ञानेश पुण्यातील आंदोलनात आदित्य ठाकरे बरसले, दोघांच्या राजीनाम्यावर महत्त्वाचं विधान

आपण गद्दार ज्ञानेश कुमारांचा राजीनामा घेणारच आणि भिमनवारांचाही राजीनामा घेणार म्हणजे घेणारच, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. ते पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात बोलत होते.

रोहित पवारांच्या पुण्यातील आंदोलनाचे पडसाद राज्यात उमटत आहेत. आज रात्री पुण्यात अनेक घडामोडी घडल्या आहेत. संजय राऊत, आणि राज ठाकरे यांच्या पुण्यातील आंदोलनस्थळी भेटीनंतर आता पुण्यामध्ये सुरु असलेल्या एमपीएससी विद्यार्थी आंदोलनाला ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनीदेखील भेट दिली. (resignation) यावेळी त्यांनी केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवरही टीका केली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की, ‘केंद्र सरकार कोण चालवत आहे. भिमनवार यांच्या मागे कोण आहे? यावर विद्यार्थ्यांनी त्यांना उत्तर दिलं, ज्यामध्ये सरकारचं नावं त्यांनी घेतलं. त्यानंतर आपण गद्दार ज्ञानेश कुमारांचा राजीनामा घेणारच आणि भिमनवारांचाही राजीनामा घेणार म्हणजे घेणारच, असं आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं आहे.

ज्ञानेश कुमार आणि विवेक भिमनवारांवर टीकास्र पुढे बोलताना आदित्य ठाकरेंनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्यावर टीका केली. (resignation) त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. त्यांनी म्हटलं की, दिल्लीत निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ज्ञानेश कुमार आणि राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार बसले आहेत. या दोघांच्या पाठीशी सरकार आहे. या दोघांचेही राजीनामे झाले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली.

त्या दोघांमुळे देशाचं भवितव्य खराब विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पुढे त्यांनी सांगितलं की, तुमचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात गेला आहे. आपल्या सर्वांची एकच मागणी आहे ती म्हणजे राजीनामा. कोणी राजीनामा दिला पाहिजे, असा प्रश्न विचारुन आदित्य ठाकरे थांबले, तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांच्या गर्दीतून विवेक भिमनवार यांच्या नावाचा आवाज आला. तेव्हा आदित्यांनी म्हटलं की, “हे फडणवीस साहेब ऐकून घ्या. (resignation) यावेळी बोलताना ते म्हणाले की भिमनवार हे फक्त प्यादे आहेत. मुद्दा महत्त्वाचा आहेच, पण देशभरात आणखी एक आंदोलन सुरु आहे, ते म्हणजे ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचं. तुम्हाला कल्पना असेल राहुल गांधी, प्रियाकां गांधी आणि अन्य खासदारांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे हे सरकार आता दडपशाहीची भूमिका राबवत असल्याची टीका आदित्य यांनी त्यांच्या भाषणात केली आहे.

हेही वाचा : 

राज्यातील साखर कामगार २२ ऑक्टोबर पासून बेमुदत संपावर कोल्हापुरात इशारा मोर्चावेळी घोषणा

MPSC च्या अध्यक्षांचा राजीनामा घेणार का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले

सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना आई-बाळाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू