राज्यातील विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली शाळांमधील कँटीन, उपहारगृह आणि मध्यान्ह भोजन व्यवस्थेची काटेकोर तपासणी केली जाणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

शाळांमधील अन्नसुरक्षेसाठी विशेष मोहीम अन्नातील भेसळ रोखण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईनंतर आता एफडीएने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत राज्यभरातील खासगी शाळांमधील कँटीन, उपहारगृह आणि मध्यान्ह भोजन व्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या मोहिमेअंतर्गत अन्न तयार करण्यापासून ते विद्यार्थ्यांना ते वितरित होईपर्यंत प्रत्येक टप्प्याची तपासणी केली जाणार आहे. स्वच्छता, अन्नाचा दर्जा आणि अन्नसुरक्षा कायद्याचे पालन होत आहे की नाही, (Tukaram Mundhe) याचीही पडताळणी केली जाईल.
यासंदर्भात मुंबईमध्ये शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षण विभागाचे अधिकारी (Tukaram Mundhe) तसेच मध्यान्ह भोजन पुरवठा करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शाळांमधील स्वयंपाकघर, कँटीन आणि अन्न साठवणूक परिसर स्वच्छ ठेवणे, अन्न तयार करताना निर्धारित मानकांचे पालन करणे आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित कोणताही हलगर्जीपणा होऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा एफडीएचे सहाय्यक आयुक्त पी. आर. सिंगारवाड यांनी अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा, कँटीन चालक आणि मध्यान्ह भोजन पुरवठादारांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसून तपासणीत दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
गेल्या काही वर्षांत मध्यान्ह भोजनात निकृष्ट दर्जाचे अन्न, अळ्या, दूषित पदार्थ तसेच शाळांच्या कँटीनमधील अस्वच्छतेच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्यव्यापी तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. (Tukaram Mundhe) तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘स्टिंग’ ऊर्जा पेयाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. अन्नातील भेसळ किंवा अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास नागरिकांनी 1800222365 या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा :
मिरज पंचायत समितीत पुढचा सभापती भाजपचा?
चीनला मोठा दणका, भारताजवळ बांधत होता धरण, ब्रह्यपुत्र नदीवर थेट?