तुकाराम मुंढेंचा सुपरस्टार्सला दणका थेट उच्च न्यायालयात प्रकरण, नवी अपडेट समोर

गेल्या काही दिवसांपासून विमल पान मसालाची जाहिरात ही चांगलीच चर्चेत आहे. एफडीएने ही जाहिरात करणाऱ्या सुपरस्टार्सला कारणे द्या नोटीस बजावली होती. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

राज्यातील अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे त्यांच्या धडाकेबाज कारवायांमुळे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या धडक कारवायाच सतत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तुकाराम मुंढे यांनी बॉलिवूडच्या सुपरस्टार्सलाही सोडले नाही. अन्न व औषध प्रशासनाने विमल इलायची जाहिरातीवर आक्षेप घेतला. (Tukaram Mundhe) त्यानंतर याची जाहिरात करणाऱ्या सुपरस्टार्सला धारेवर धरण्यात आले. आता हा वाद इतका पेटला आहे की थेट हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले आहे.

विमल इलायचीच्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. अभिनेता अजय देवगण आणि महाराष्ट्र एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील या वादावर ४ नोव्हेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. एफडीएने अजय देवगण यांना बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीला आव्हान देत अभिनेत्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर ४ नोव्हेंबर रोजी सुनावणी होऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. एफडीएचा आरोप आहे की, विमल इलायचीच्या जाहिरातीच्या माध्यमातून प्रतिबंधित पान मसाल्याची जाहिरात केली जात आहे. (Tukaram Mundhe) याच प्रकरणात शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

अजय देवगण यांनी आपल्या याचिकेत आक्षेप घेतला आहे की, नोटीस ही संबंधित कंपनींना देणे आवश्यक असताना त्यांना वैयक्तिकरित्या का नोटीस दिली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर हा वाद आता उच्च न्यायालयात पोहोचला असून, ४ नोव्हेंबरच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Tukaram Mundhe) दरम्यान, विमलच्या जाहिरातीमुळे यापूर्वीही वाद निर्माण झाला होता. २०२२ मध्ये, विमलच्या जाहिरातीत दिसल्याबद्दल अक्षय कुमारला टीकेला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर त्यानं माफी मागितली आणि त्या जाहिरातीशी आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. आता, अजय देवगणनं उच्च न्यायालयात धाव घेतल्यानं, या प्रकरणातील कायदेशीर लढाई आणखी तीव्र होऊ शकते.

हेही वाचा : 

मारहाण करून एकाचे अपहरण सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

संजय गायकवाड गोत्यात मोठी कारवाई होणार एकनाथ शिंदेंकडून थेट आदेश

अहान शेट्टीच्या ‘सनकी’ या अ‍ॅक्शन ड्रामाच्या शूटिंगला 30 ऑक्टोबरपासून सुरुवात