राष्ट्रीय महामार्ग वापरणाऱ्या दुचाकी वाहनांसाठी मोठी बातमी येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता दुचाकी वाहनांना राष्ट्रीय महामार्गावरही टोल(toll) भरावा लागणार आहे. हा नियम १५ जुलैपासून लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे.

नवीन नियमानुसार, दुचाकी वाहनांना FASTag द्वारे टोल भरावा लागणार असून, नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना २००० रुपये दंड भरावा लागणार आहे. यापूर्वी जेव्हा तुम्ही दुचाकी खरेदी करता तेव्हा त्या वेळी टोल कर घेतला जातो.
त्यामुळे जेव्हा दुचाकी वाहने राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझावरून जातात तेव्हा त्यांच्याकडून टोल वसूल केला जात नव्हता. तर फक्त चारचाकी वाहनांसह मोठ्या वाहनांकडून टोल घेतला जात होता. परंतु, आता नव्या नियमानुसार येत्या 15 जुलैपासून NHAI वरून जाणाऱ्या दुचाकी वाहनचालकांनादेखील टोल भरावा लागणार आहे.
यापूर्वी टोलच्या(toll) नियमात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या 15 ऑगस्टपासून वाहनचालकांना फास्टटॅगचा वार्षिक पास बनवता येणार आहे. हा पास वार्षिक 3 हजार रूपयांचा असेल अशी मोठी घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केली आहे.
१५ ऑगस्ट २०२५ पासून खाजगी वाहनांसाठी (जसे की कार, जीप, व्हॅन इ.) ३,००० रुपयांचा फास्टॅग आधारित वार्षिक पास जारी केला जाईल. हा पास सक्रिय झाल्याच्या तारखेपासून एक वर्ष किंवा २०० ट्रिपसाठी, जे आधी असेल ते वैध असेल. या पाससाठी लवकरच एक स्वतंत्र लिंक NHAI आणि MoRTH च्या वेबसाइटवर आणि ‘हायवे ट्रॅव्हल अॅप’ वर उपलब्ध करून दिली जाईल, ज्यामुळे पासचे सक्रियकरण आणि नूतनीकरण सोपे आणि सोयीस्कर होईल असे गडकरी यांनी म्हटले आहे.

नवीन पासचा नेमका उद्देश काय?
नवीन वार्षिक पास धोरणाचा उद्देश ६० किमीच्या परिघात असलेल्या टोल(toll) प्लाझांशी संबंधित दीर्घकालीन समस्या सोडवणे आहे. एकाच डिजिटल व्यवहाराद्वारे टोल पेमेंट सोपे करणे, टोल प्लाझावरील प्रतीक्षा वेळ कमी करणे, गर्दी कमी करणे आणि वादाचे प्रसंग टाळणे यासाठी होणार आहे.
Two-wheelers in India will no longer enjoy the privilege of a toll-free experience at highway entry points from July 15, 2025. pic.twitter.com/HRQisu3yVg
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) June 26, 2025
फास्टॅग म्हणजे काय?
फास्टॅग हे एक उपकरण आहे जे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) तंत्रज्ञानाचा वापर करते. ज्यामुळे टोल पेमेंट थेट त्याच्याशी जोडलेल्या प्रीपेड खात्यातून करता येते. ते तुमच्या वाहनाच्या विंडस्क्रीनवर चिकटवले जाते आणि तुम्हाला रोख व्यवहारांसाठी न थांबता टोल प्लाझातून जाण्याची परवानगी देते. तुम्हाला तुमच्या गरजेनुसार टॅग रिचार्ज/टॉप अप करावा लागतो.
फास्टॅगचे फायदे
FASTag वापरण्याचे अनेक फायदे आहेत. याच्या वापरामुळे वाहनचालकांना त्यांच्या टॅग खात्यात केलेल्या सर्व व्यवहारांसाठी नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एसएमएस अलर्ट मिळतो. यामुळे वाहनचालकांना टोल पेमेंटसाठी रोख रक्कम जवळ बाळगावी लागत नाही. डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे फास्टटॅग खाते ऑनलाइन रिचार्ज करता येते. याशिवाय, ग्राहक FASTag ग्राहक पोर्टलवर लॉग इन करून त्यांचे स्टेटमेंट पाहू शकतात
हेही वाचा :
कुत्रा चिरडल्याच्या रागातून रुग्णवाहिकेला अडवून चालकाला मारहाण; विलंबामुळे रुग्णाचा मृत्यू
या 4 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा अलर्ट, समुद्राला मोठी भरती, 4.75 मीटर उंचीच्या लाटा उसळणार
नियंत्रण सुटले अन् 18 प्रवाशांची बस थेट अलकनंदा नदीत कोसळली..; रुद्रप्रयागमध्ये अपघातांची मालिका