बनावट दारू म्हणजे नक्की काय? ती विषारी बनते कशी अन् यामुळे लोकांचा मृत्यू का होतो? जाणून घ्या

देशात मोठ्या प्रमाणात मद्यपान केले जाते पण काही गुन्हेगारी मानसिकतेचे (alcohol)लोक बनावट दारू बनवून नफा कमवण्याच्या नादात अनेकांच्या जीवाशी खेळतात. अशा बातम्या आपण नेहमीच ऐकल्या असतील. पण ही बनावट दारू म्हणजे नक्की काय आणि त्याने माणसांचा जीव जाऊ शकतो असं काय मिसळलं जातं त्यात? खरं तर, बनावट दारू बनवण्याचा हा संपूर्ण खेळ मिथाइल अल्कोहोल आणि इथाइल अल्कोहोलबद्दल आहे. इथाइल अल्कोहोल, ज्यापासून दारू बनवली जाते, ती नैसर्गिक प्रक्रियेद्वारे तयार केली जाते, तर मिथाइल अल्कोहोल हे खत उद्योगातील कचरा असतो. मिथाइल अल्कोहोल आपल्या शरीरासाठी खूप धोकादायक असतं.

बनावट दारू नक्की कशी बनवतात?
एका अहवालानुसार, फक्त 10 मिली मिथाइल अल्कोहोल एखाद्या व्यक्तीला आंधळे करण्यासाठी पुरेसे आहे. त्यामुळे त्याचा जीवही जाऊ शकतो. एका डॉक्टरांच्या मते मिथाइल अल्कोहोल यकृतापर्यंत पोहोचल्यानंतर फॉर्मेल्डिहाइडमध्ये बदलते, जे एक तीव्र विष आहे. ज्यामुळे लोक मरतात.(alcohol) खरंतर, मिथाइल अल्कोहोल आणि इथाइल अल्कोहोल दोन्ही सारखेच दिसतात, त्यांचा वास आणि स्वरूप देखील सारखेच असते.

विषारी दारू बनवतात
प्रयोगशाळेतील चाचणीशिवाय दोन्ही ओळखणे कठीण आहे. कदाचित हेच सर्वात मोठे कारण आहे की दारू बनवणारे, ते इथाइल अल्कोहोल समजून, दारू बनवताना त्यात मिथाइल अल्कोहोल मिसळतात आणि दारू विषारी बनते. दुसरे कारण म्हणजे मिथाइल अल्कोहोल फक्त 6 रुपये प्रति लिटरला उपलब्ध असते,(alcohol) तर इथाइल अल्कोहोल 40 ते 45 रुपये प्रति लिटरला उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत, काही लोक थोड्याशा नफ्यासाठी लोकांचे जीव धोक्यात घालून विषारी दारू बनवतात, हे कटू सत्य नाकारता येत नाही.

बनावट दारूसाठीचे साहित्य गुजरातमधून येतं
उत्पादन शुल्क अधिकारी वरुण कुमार म्हणतात की मिथाइल अल्कोहोलचा सर्वाधिक पुरवठा गुजरातमधून होतो. ते पातळ बनवण्यासाठी आणि रंग तयार करण्यासाठी वापरले जाते. (alcohol)हे रसायन गुजरातहून मोठ्या टँकरमधून वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणले जाते. वाटेत ट्रकचालक ते तथाकथित कंत्राटदारांना स्वस्त दरात विकतात आणि मग येथून विषारी दारू बनवण्याचा खेळ सुरू होतो, बनावट दारू प्रकरणात पकडलेल्या काही लोकांनी पोलिस चौकशीदरम्यान याबद्दलचे हे धक्कादायक खुलासे केल्याचं म्हटलं जातं.

हेही वाचा :

वैष्णवी हगवणे प्रकरण भोवले! रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

डोनाल्ड ट्रम्पचे ‘Air Force One’ जगात भारी; राजेशाही थाट पाहून तुमचेही डोळे दीपतील

हॉटेलमधून चेक आउट करताना रुममधील ‘या’ 5 वस्तू घरी घेऊन जाऊ शकता