शिंदे राहिले त्या हॉटेलमध्ये काय घडलं ? सतेज पाटील करणार मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रार

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक(hotel) यांच्या प्रचारार्थ गेल्या तीन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात तळ ठोकला आहे. कोल्हापुरातील हॉटेल पंचशील येथे गेले तीन दिवसांपासून डॅमेज कंट्रोल चे काम सुरू आहे.

यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानिक पदाधिकाऱ्यांसह(hotel) प्रमुख कार्यकर्ते आणि नेत्यांची भेट घेत आहेत. तीन दिवसांपासून कोल्हापुरात असलेले मुख्यमंत्री यांनी काल दुपारी सभेच्या निमित्ताने कोल्हापूर बाहेर गेले. मात्र तीन दिवस ठाण मांडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांना मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे वेगळाच संशय व्यक्त केला आहे.त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा सतेज पाटील यांनी दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर 26 एप्रिल रोजी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापुरात दाखल झाले होते. सभा स्थळाची पाहणी करून ते हॉटेल पंचशील येथे बसून ठिकठिकाणी संपर्क सुरू होता. 27 एप्रिलला त्यांनी स्वतंत्र रूममध्ये थांबून होते. दुपारी एकच्या सुमारास ते अंबाबाई दर्शनाला बाहेर पडून काहींच्या भेटी घेतल्या.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री रामदास आठवले आल्यानंतर त्यांची मुख्यमंत्र्यांशी एकत्रित चर्चा झाली. त्यावेळी आमदार विनय कोरे यांचेही आगमन झाले. तिथून साडेचारच्या सुमारास सर्वजण सभेसाठी बाहेर पड़ले. सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदि पुन्हा पंचशील हॉटेलवर थांबले.

शिंदे राहिले त्या हॉटेलमध्ये काय घडलं ? सतेज पाटील करणार मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रार

रात्री उशिरापर्यंत मंत्री उदय सामंत, राजवर्धन कदमबंडे, समरजितसिंह घाटगें, राजेश क्षीरसागर, अमल महाडिक यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली. पण यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री उशिरापर्यंत अनेक गुप्त व्यक्तींच्या सोबत चर्चा केली असल्याची ही माहिती समोर आली आहे.

त्याबाबत काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या सोबत गुप्त बैठक घेतले असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. त्याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही सतेज पाटील यांनी सांगितले आहे. त्यासोबत हॉटेल पंचशील चे सीसीटीव्ही चेक करावे अशी ही मागणी करणार असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले आहे.

हेही वाचा :

“मोदींनी कोल्हापुरात भडकाऊ भाषण करत…”, रोहित पाटलांची टीका

कोरोना संकटातच कोल्हे राजीनामा घेऊन आले होते; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

शिंदेंचा दणका; काँग्रेस शहराध्यक्ष्यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!