शेतकरी संघाच्या जागेबाबत कोल्हापूर जिल्ह्यात वाद ताजा असताना पुन्हा एकदा शेतकरी संघाच्या(union) कामकाजाबाबत वाद निर्माण झाला आहे. दोन महिन्यापूर्वीच शेतकरी संघाची निवडणूक पार पडली आहे. त्यानंतर आठवडाभरापासून शेतकरी संघातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरून पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.
संघातील काही संचालकांनी आपल्या मर्जीतल्या(union) अधिकाऱ्यांना यांच्या सोयीनुसार हव्या त्या ठिकाणी बदली करून दिले आहेत. पूर्वी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना 80 ते 90 किलोमीटर परिसरात बदली केली आहे. धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने शेतकरी संघात हा विषय चर्चेचा ठरला असून इतर कर्मचारी आणि अधिकारी वर्गात संताप व्यक्त होत आहे.
गेली अनेक वर्षे शेतकरी संघात दबा धरून बसलेल्या संचालकांनी एक स्वतंत्र गट तयार केला आहे. काही कारभारी संचालकांनी आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून जवळपास संघातील 30 हून अधिक अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामुळे संघात अनेक गैरसोयी निर्माण झाल्याचे चित्र आहे.
बदल्या करताना संस्थेच्या हितापेक्षा संचालकांनी स्वहिताला अधिक प्राधान्य दिल्याचे समोर येत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे इतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोल्हापुरात Kolhapur आणि कोल्हापुरातील काही अधिकाऱ्यांच्या 80 ते 90 किलोमीटर दूर बदली केली आहे.
यासह संघाच्या अनेक कामात आणि गैरव्यवहारात आघाडीवर असलेले काही कर्मचारी आणि अधिकारी कित्येक वर्ष मुख्यालयात ठाण मांडून आहेत. मात्र त्यांच्या बदलीबाबत एक शब्द देखील काढला जात नाही. ज्यांचा वशिला नाही त्यांची संघात फरफट होते अशी भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. काही कर्मचऱ्यांनी नियमबाह्य सेवानिवृतीनंतरही मुदतवाढ़ घेतली आहे. यामुळे या बदल्यांच्या प्रकरणात संघातील वशिलेबाजी चव्हाट्यावर आली आहे.
हेही वाचा :
ठाकरे गटाच्या महिला नेत्या यांना मारहाण…
भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी!
सांगलीतील ३ कॅफे एकापाठोपाठ एक फोडले; शिवप्रतिष्ठान संघटना आक्रमक