डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम; भारताविरुद्ध उभा राहणाऱ्या देशाला धोकादायक मिसाईल देणार!

भारत(India) आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावादरम्यान, तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला. तुर्कीने शेकडो ड्रोन आणि लष्करी कर्मचारी पाठवून पाकिस्तानला तांत्रिक आणि धोरणात्मक मदत केली, ज्यामुळे भारतात तुर्कीविरुद्ध प्रचंड संताप निर्माण झाला. या रागाचा परिणाम सोशल मीडियावर दिसून आला जिथे #BoycottTurkey ट्रेंड होऊ लागला आणि अनेक भारतीयांना तु्र्कीला पर्यटनासाठी जाणार नसल्याचे सांगितले. याचदरम्यान आता अमेरिका आणि तुर्कीच्या करारची चर्चा रंगली आहे.

अमेरिकेने तुर्कीला 304 दशलक्ष डॉलर्स किमतीची क्षेपणास्त्रे विकण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. भारत(India) आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला असताना आणि तुर्की उघडपणे पाकिस्तानला मदत करत असताना ही मंजुरी देण्यात आली. या क्षेपणास्त्र करारात तुर्कीसाठी हवेतून हवेत मारा करणारी AIM-120 AMRAAM क्षेपणास्त्रे समाविष्ट आहेत.

यासोबतच, तुर्कीने 225 दशलक्ष डॉलर्स किमतीची 53 प्रगत मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची आणि 79.1 दशलक्ष डॉलर्स किमतीची 60 ब्लॉक सेकंड क्षेपणास्त्रांची मागणी केली आहे. हा करार यूएस डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सी (DSCA) ने प्रस्तावित केला आहे, परंतु त्याला अद्याप अमेरिकन काँग्रेसची मान्यता मिळालेली नाही.

जर हा करार मंजूर झाला तर दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंध आणखी मजबूत होतील. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प डबल गेम खेळत असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, विशेषतः जेव्हा तुर्कीने रशियाकडून एस-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी केली होती. त्यावेळी अमेरिका आणि तुर्कीमध्ये तणाव निर्माण झाला होता. परंतु आता नवीन करारावरुन अमेरिका तुर्कीसोबत संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.

दहशतवादाच्या विरोधातील या लढ्यात अनेक देशांनी भारताची(India) साथ दिली असताना, काही देश पाकिस्तानच्या बाजूने आहे. यात तुर्कीनेही भारताविरुद्ध आवाज उठवला आहे. शिवाय त्यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या तणावादरम्यान, तुर्कीने पाकिस्तानला जाहीर पाठिंबा दिला. तसेच या तणावादरम्यान तुर्कीने भारतावर हल्ले करण्यासाठी ड्रोन देखील पुरवल्याची माहिती आली होती.

मात्र आता आणखी एक खळबळजनक माहिती हाती लागली आहे. तुर्कीने पाकिस्तानला फक्त शस्त्रे दिली नाही, तर ती शस्त्रे चालवण्यासाठी सैनिकही पाकिस्तानात पाठवले होते. भारताच्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानच्या सैन्यासोबत तुर्कीचे देखील सैन्य उपस्थित होते. तसेच ऑपरेशन सिंदूरमध्ये दोन तुर्की सैनिकही मारले गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

चतुर्थी स्पेशल! सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा उपवासाचे कुरकुरीत थालीपीठ

‘गोविंदा एका मूर्ख बाईसाठी….’; गोविंदाच्या बायकोचा मोठा खुलासा

अभिनेत्री दीपिकाला गंभीर आजार; व्हिडीओ शेअर करत दिली धक्कादायक माहिती