राष्ट्रवादीला अर्थ खातं मिळणार का? जय पवारांनी दिली महत्वाची माहिती?

अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या अर्थखात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवली आहे. मात्र हे महत्त्वाचे खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार का, (Finance) याबाबत आता युवा नेते जय पवार यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. बारामतीतील एका कार्यक्रमात त्यांनी यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली.

बारामतीतील कार्यक्रमात जय पवारांचे भाष्य बारामती येथे स्वर्गीय अजित पवार यांच्या सहवासात काम केलेल्या आजी-माजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांसाठी कृतज्ञता स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार उपस्थित होते. मोठ्या संख्येने माजी आणि विद्यमान लोकप्रतिनिधींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी बोलताना जय पवार यांनी अर्थखात्याच्या प्रश्नावर महत्त्वाची माहिती दिली.त्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. (Finance) तसेच अजित पवार इतक्या लवकर आपल्यातून निघून जातील, अशी कल्पना कुणालाही नव्हती, असेही त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले. अर्थखाते राष्ट्रवादीकडे नसल्यामुळे विकासकामे थांबली आहेत, असा समज चुकीचा असल्याचे त्यांनी नमूद केले. अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखाते स्वतःकडे ठेवले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचा दावा पुढे बोलताना जय पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अर्थखात्याबाबत चर्चा झाल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले की, हे खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच यासंदर्भात निर्णय होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याच कार्यक्रमात त्यांनी अजित पवार यांच्या स्मारकाबाबतही माहिती दिली. बारामती येथे त्यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Finance) दरम्यान, जय पवार यांच्या या विधानामुळे अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार का, तसेच भविष्यात या खात्याची धुरा कोणाकडे सोपवली जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा :

पाण्याची कमतरता भासतेय? 7 उपायांनी घरातील रोपे राहतील टवटवीत?

कापूसखेड येथे उसाच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळला?

30 जूननंतर जुन्या ₹10, ₹20, ₹50 आणि ₹100 च्या नोटा बंद होणार?