सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून 2005 पूर्वी जारी करण्यात आलेल्या ₹10, ₹20, ₹50 आणि ₹100 च्या नोटांबाबत एक संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या संदेशात 30 जून 2026 नंतर या नोटा बँक ऑफ महाराष्ट्रच्या कोणत्याही शाखेत स्वीकारल्या जाणार नाहीत, (notes) असा दावा करण्यात आला होता. या दाव्यामुळे अनेक ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र, या व्हायरल संदेशावर आता बँक ऑफ महाराष्ट्रने अधिकृत भूमिका स्पष्ट करत तो पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे सांगितले आहे. बँकेने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात व्हायरल पोस्टमधील सर्व माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट केले असून ग्राहकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.व्हायरल संदेशामध्ये 1 जुलै 2026 पासून 2005 पूर्वीच्या ₹10, ₹20, ₹50 आणि ₹100 च्या नोटा बँकेच्या कोणत्याही शाखेत स्वीकारल्या जाणार नाहीत (notes) तसेच त्या केवळ रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत केंद्रांमध्येच जमा करता येतील, असा दावा करण्यात आला होता. मात्र, बँक ऑफ महाराष्ट्रने या दाव्याचे स्पष्टपणे खंडन केले असून अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे सांगितले आहे.
बँकेने ग्राहकांना आर्थिक व्यवहार किंवा बँकिंगशी संबंधित कोणतीही माहिती मिळवताना केवळ अधिकृत माध्यमांवरच विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये बँकेचे अधिकृत संकेतस्थळ, अधिकृत सोशल मीडिया हँडल्स तसेच रिझर्व्ह बँकेची अधिकृत माध्यमे यांचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (notes) याशिवाय, सोशल मीडियावर व्हायरल होणारे अप्रमाणित संदेश पुढे पाठवू नयेत आणि कोणतीही माहिती सत्यता पडताळूनच शेअर करावी, असेही बँकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे 2005 पूर्वीच्या नोटांबाबत सध्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे बँकेच्या स्पष्टीकरणातून स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा :
इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?
1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?