खामेनेई यांच्या अंत्ययात्रेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार? काय आहे भारताची स्ट्रॅटर्जी?

इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या 4 ते 9 जुलैदरम्यान होणाऱ्या राजकीय अंत्यसंस्कार सोहळ्यासाठी जगभरातील अनेक देशांच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही औपचारिक निमंत्रण पाठवले होते. मात्र भारताकडून पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (funeral) त्याऐवजी भारत सरकारने उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळ इराणमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा आणि बिहारचे राज्यपाल सैयद अता हसनैन भारताचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून अंत्यसंस्कार सोहळ्यात सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयातून भारताने इराणशी असलेले ऐतिहासिक आणि धोरणात्मक संबंध कायम ठेवतानाच राजनैतिक संतुलन राखण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. (funeral) गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम आशियात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत भारताने सातत्याने संतुलित भूमिका घेतली आहे. एकीकडे इस्रायलसोबतचे संरक्षण, तंत्रज्ञान आणि धोरणात्मक संबंध महत्त्वाचे आहेत, तर दुसरीकडे ऊर्जा सुरक्षा, चाबहार बंदर आणि प्रादेशिक हितसंबंधांमुळे इराणशी संबंधही भारतासाठी तितकेच आवश्यक आहेत.

(funeral) त्यामुळे सर्वोच्च पातळीवरील उपस्थिती टाळून अधिकृत प्रतिनिधीमंडळ पाठवण्याचा निर्णय हा भारताच्या संतुलित परराष्ट्र धोरणाचा भाग मानला जात आहे. इराणमध्ये अंत्यसंस्कार सोहळ्यादरम्यान कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, देशभरात विविध धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावरही महत्त्वाची मानली जात आहे.

हेही वाचा :

लाडक्या बहिणींचं बँक खातं होणार फुल्ल? आता थेट 3000 रुपये?

पुणे-नाशिककरांनो रेल्वे संदर्भात अत्यंत महत्वाची बातमी?

WhatsApp वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी महत्त्वाच्या फीचरबाबत केंद्र सरकार अलर्ट?