शेतकर्यांना आर्थिक मदत म्हणून पीएम किसान योजना राबवली जाते. (farmers) यामध्ये शेतकर्यांच्या खात्यात वर्षाला एकूण ६ हजार रुपये जमा केले जातात. वर्षात एकूण ३ तीन हप्त्यांमध्ये हे पैसे पाठवले जातात. सध्या यामध्ये निधी वाढवण्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.

नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यात २३ वा हप्ता जमा झालेला आहे. आता २४ व्या हप्त्याबद्दल चर्चा सुरू असताना या निधीत वाढ होणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे. (farmers) त्यातच या विषयावर कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सरकारकडून उत्तर दिलेलं आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून पीएम किसान योजनेच्या वार्षिक आर्थिक मदतीत वाढ होणार असल्याची चर्चा सुरू आहे. सध्या मिळणारी ६ हजार रुपयांची मदत वाढवून ती ९ हजार रुपये करण्यात यावी, अशी अनेक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे २४ व्या हप्त्याआधी सरकारकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण यावर आता केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका मांडली आहे.
लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं की, पीएम किसान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या वार्षिक ६ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीत वाढ करण्याचा सध्या सरकारसमोर कोणताही प्रस्ताव नाही. (farmers) यामुळे पीएम किसान योजनेच्या २४ व्या हप्त्यामध्येही पात्र शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे २ हजार रुपयांचाच हप्ता मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. यात कोणताही बदल झाला की, सरकार अधिकृत घोषणा करेल.
हेही वाचा :
झिम्बाब्वेविरुद्धचा सामना कुठे पाहता येणार? योग्य माहिती जाणून घ्या?