कालच्या अभिजीत दीपकेने ठाकरे बंधूना गृहीत धरले आहे!

ठाकरे बंधू यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 4 ऑक्टोबर रोजी निघालेल्या मोर्चात अभिजीत दिपके याच्या सीजेपी पार्टीचा एक ठिपका सुद्धा दिसला नाही.मात्र रविवारी बंदी हुकूम तोडून सीजेपीने मुंबईत केलेल्या आंदोलनात तिघे ठाकरे बंधू होते. (Abhijeet Deepak) याचा अर्थच असा आहे की राजकारणात काही महिन्यापूर्वी आलेल्या अभिजीत दिपके याने आपल्या लढ्यात ठाकरे बंधूंना गृहीत धरलेले आहे.

सीजेपी मध्ये अभिनेता प्रकाश राज, अभिनेता नासिरुद्दीन शहा, शबाना आजमी असे काही कलाकार आहेत आणि या मंडळींची विचारधारा संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. अभिजीत हा दिल्ली दंगलीतील आरोपी असलेल्या उमर खलिद यांला तो आपला आदर्श मानतो. (Abhijeet Deepak) त्यामुळे त्याचे सर्व सहकारी एका कथित देशद्रोह्याशी संबंधित आहेत. आणि ठाकरे बंधू त्याला सर्व प्रकारचे सहकार्य करताना दिसत आहेत. याचा अर्थच असा आहे की उमर खलिद च्या विरोधात ठाकरे बंधू नाहीत.सी जे पी ला समर्थन देणाऱ्या मध्ये असे काही महाभाग आहेत की त्यांनी याकूब मेमन ची फाशीची शिक्षा रद्द करावी अशी मागणी केली होती. ठाकरे बंधू यांना अशी मंडळी चालणार आहेत का?

ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा, त्यांनी घेतलेल्या निर्णयांची त्रयस्थ यंत्रणांकडून चौकशी करण्यात यावी, मतदार पुनरिक्षण अर्थात एस आय आर रद्द करण्यात यावा या मागणीसाठी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भायखळा ते मुंबई महापालिका असा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात इतर विरोधी पक्ष सहभागी झाले होते. मात्र अभिजीत दिपके आणि त्याचे नेहमीचे सहकारी या मोर्चात दिसले नाहीत. त्यांनी पाठिंबा जाहीर करून मोर्चात सहभागी होण्याचे टाळले होते. रविवारी सीजेपी चे जंतर-मंतरवर आंदोलन होते मात्र दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली होती त्यानंतर हे आंदोलन कॅनॉट परिसरात झाले. दिपके व त्याचे इतर सहकारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि नंतर सक्षम यंत्रणे कडून काही अटी घालून त्यांना सोडून देण्यात आले होते.

बीजेपीच्या मुंबईच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्कवर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता मात्र मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली. पण तरीही त्यांनी शिवाजी पार्कवर जाण्याचा प्रयत्न केला आणि मग पोलिसांनी बाळाचा वापर करून अनेकांना अटक केली. सीजेपीच्या अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडावे यासाठी आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि अमित ठाकरे हे रस्त्यावर उतरले होते. पण पोलिसांच्या पुढे (Abhijeet Deepak) त्यांची काही मात्रा चालली नाही.शिवसेना ही विविध विषयावरची आंदोलने करून समाजकारणात आणि राजकारणात पुढे आली होती. आंदोलन कसे करायचे हे शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरे यांना माहीत होते. आता मुंबईत आंदोलन करण्यासाठी दोन-तीन महिन्यापूर्वी अस्तित्वात आलेल्या सी जे पी ची ऊर्जा ठाकरे बंधूंना घ्यावी लागत आहे यासारखे दुसरे दुर्दैव कुठले नाही. अर्थात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अभिजीत दिपके यांना परमेश्वराचा अवतार आहे असे म्हटले होते. ही त्यांची अगतिकता होती की आपल्या शत्रूबरोबर तो लढतो आहे म्हणून त्याला परमेश्वराच्या अवतारात बघितले होते हे कळावयास मार्ग नाही. एकूणच ठाकरे बंधू सी जे पी च्या फारच प्रेमात पडलेले दिसतात असे म्हटले तर त्यात वावगे काही होणार नाही.

हेही वाचा : 

अखेर मोदी सरकारने तो निर्णय घेतलाच कांद्याचा भाव धाडकन कमी सामान्यांना मोठा दिलासा

 महाराष्ट्रात दुष्काळ, आयपीएल २०२७ चे सामने दुसऱ्या राज्यात हलवणार कदाचित संपूर्ण स्पर्धाच भारताबाहेर

शिरोळमधून युतीच्या उमेदवारांना पॅनेल टू पॅनेल मतदानाची ग्वाही