मार्केटमध्ये मारुती सुझुकीच्या अनेक उत्तम कार पाहायला(market) मिळतात. Maruti Suzuki XL6 ही त्यातीलच एक कार. मात्र, या कारसाठी जर तुम्ही 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले तर किती EMI द्यावा लागेल? याबद्दल जाणून घेऊयात.

भारतात अनेक लोकप्रिय कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करतात. Maruti Suzuki ही त्यातीलच एक आघाडीची कार उत्पादक कंपनी, जे अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या मागणी (market)आणि आवश्यकतेनुसार चांगल्या परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर करत असतात. कंपनीच्या अनेक कार या ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. Maruti Suzuki XL6 ही त्यातीलच एक कार.
नुकतेच कंपनीने Maruti Suzuki XL6 चे सेफ्टी फीचर्स अपडेट केले आहे. मात्र, याच्या किमतीत सुद्धा वाढ झाली आहे. ही सहा सीटर MPV पेट्रोल आणि CNG इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे.(market) जर तुम्ही या MPV चा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, पुढील सात वर्षांसाठी तुम्हाला दरमहा किती EMI भरावा लागेल, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
Maruti XL6 किंमत?
मारुती XL6 ही सहा सीटर MPV म्हणून ऑफर केली जाते. याचा बेस व्हेरिएंट 11.84 लाख रुपयांच्या ऑन-रोड किमतीत उपलब्ध करून देत आहे. जर ही कार दिल्लीत खरेदी केली तर 1.19 लाख रुपयांच्या रजिस्ट्रेशनसह, इंश्युरन्ससाठी सुमारे 37 हजार रुपये द्यावे लागतील. याशिवाय, या MPV साठी TCS शुल्क म्हणून 16635 रुपये देखील द्यावे लागेल. त्यानंतर त्याची ऑन-रोड किंमत 13.56 लाख रुपये होईल.
2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल किंमत?
जर तुम्ही मारुती XL6 चा बेस व्हेरिएंट खरेदी केला तर बँक फक्त एक्स-शोरूम किमतीवरच फायनान्स करेल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 11.56 लाख रुपयांची रक्कम कर्ज म्हणून घ्यावी लागेल. जर बँक तुम्हाला 9 टक्के व्याजासह 7 वर्षांसाठी 11.56 लाख रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील 7 वर्षांसाठी दरमहा फक्त 18614 रुपये ईएमआय भरावा लागेल.
महागातच पडेल कार
जर तुम्ही बँकेकडून 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 11.56 लाख रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला 7 वर्षांसाठी दरमहा 18614 रुपयांचा EMI भरावा लागेल. अशा परिस्थितीत, 7 वर्षांत तुम्हाला मारुती XL6 च्या बेस व्हेरिएंटसाठी सुमारे 4.06 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर तुमच्या कारची एक्स-शोरूम, ऑन रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 17.63 लाख रुपये असेल.
हेही वाचा :
एका चुकीमुळे 4 वर्षीय मुलीचा आईच्या डोळ्यादेखत 12 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू
पत्नीने हुंडा दिला नाही म्हणून जन्मदाता बापाकडून आठ महिन्याच्या चिमुकल्यावर अमानुष कृत्य