परीक्षा न देता मिळणार नोकरी; अर्ज करण्यासाठी काय करायचं ?

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी(especially) आहे. इंडिया पोस्ट पेमेंटने या वर्षीची भरती सुरु केली आहे. इंडिया पोस्ट पेमेंटच्या रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी अर्ज नोंदणी सुरु करण्य़ात आली आहे. सरकारी किंवा खाजगी नोकरी रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी त्या त्या पदांच्या परीक्षा द्याव्या लागतात. मात्र इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज नोंदणीनंतर मुवलाखत घेण्यात येईल. अर्जनोंदणी करण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंटच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

इंडिया पोस्ट पेंमेंटमध्ये एकूण 51 रिक्त पदांच्या भरती सुरु करण्यात आली आहे. या पदांसाठी इत्छुक असेलेले उमेदवार संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करु शकतात. या पदांसाठी इंडिया पोस्टने उमेदवारांसाठी काही नियम आणि अटी देखील दिल्या आहेत. तुम्ही जर इंडिया पोस्ट पेंमेंटमधील रिक्त पदांसाठी इच्छुक असाल तर तुम्ही पदवीधर असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार पदवीत मिळालेल्या गुणांच्या आधारे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवार निवडण्यात येणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी सदर नोंदणी अर्ज केल्यानंतर गुणवत्ता यादीनुसार निवडण्यात येणाऱ्या उमेदवारांची मुलाखत प्रवेशिका घेण्यात येईल. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या (especially) राज्यासाठी नोंदणी करणार आहात त्या राज्याचा रहिवासी दाखल असणं देखील तेवढच महत्वाचं आहे. त्याचबरोबर या रिक्त पदांच्या भरतीबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत.

रिक्त पदांच्या भरतीबाबत करार
रिक्त पदांच्या भरती झाल्यानंतर हा वर्षभराचा करार असल्याचं सांगितलं आहे. वर्षभरात कामाचं कौशल्य़ा माहित करुन घेत सामाधानकारक बाब असल्यास पुढील वर्षाची मुदत वाढ (especially) करुन करार केला जाईल असं देखील सांगण्यात आलं आहे.

काय असेल वेतन ?
या रिक्त पदांच्या पात्र उमेदवारांना दर महिना 30 हजार रुपये वेतन दिलं जाईल असं देखील नमुद करण्यात आलं आहे. या पदांसाठी तुम्ही 25 मार्चपर्यंत अर्ज नोंदणी करु शकता. अधिकृत माहितीसाठी ippbonline.com या संकेतस्थळा तुम्हा भेट देऊ शकता.

हेही वाचा :

पाचव्यांदा आई होणार सीमा हैदर; बेबी शॉवरचा व्हिडिओ तुफान व्हायरल

घरात मांजर पाळताय, सावधान! बर्ड फ्लूने घेतला 18 मांजरींचा बळी

इचलकरंजीत हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी जल फवारणी यंत्रणेची मागणी