दाऊदच्या पिल्लावळीची वळवळ!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

दिल्ली आणि मुंबई येथे दहशतवादी हल्ले करण्याचा एक व्यापक कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला आहे आणि 11 दहशतवाद्यांना अटक केली आहे. गेल्या काही वर्षानंतर प्रथमच या दहशतवादी गटाच्या निमित्ताने कुविख्यात दाऊद इब्राहिम आणि त्याच्या टोळीचे नाव पुढे आले आहे. दाऊद जिवंत आहे आणि त्याची प्रकृती ठणठणीत आहे असा एक संदेश आय एस आय संघटनेला मुंबईपर्यंत पोहोचवायचा होता, आणि तो वेगळ्या अर्थाने यशस्वी झाला आहे असे म्हणता येईल. 2026 मध्ये बहुचर्चित “धुरंधर”या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला होता. अजूनही तो काही ठिकाणी पहावयास मिळतो. या दुसऱ्या भागात दाऊद इब्राहिम हा रुग्णालयात उपचार घेतो आहे आणि तो मरणासन्न अवस्थेत आहे असे दाखवले आहे. धुरंधर या चित्रपटाचे दोन्ही भाग हे सत्य घटनेवर आधारित असल्यामुळे दाऊद इब्राहिम ची अवस्था सध्या अतिशय विकलांग आहे असे तमाम भारतीयांना वाटते आहे.

गेल्या दीड दोन वर्षांपासून सोशल मीडियावर पॉडकास्ट च्या माध्यमातून मुंबईतील काही वरिष्ठ निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना बोलते केले जात आहे. दाऊद इब्राहिम याला केंद्रस्थानी ठेवून या पॉडकास्ट मुलाखतीमध्ये निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले जात आहेत. (moving) त्यामुळे दाऊद इब्राहिम विषयी देशांमध्ये पुन्हा चर्चा होताना दिसते आहे. त्याला विनाकारण मीडियात आणले जात आहे. जणू तो मसीहा आहे, असे चित्र रंगवले जाते आहे. त्याला चर्चेच्या पडद्यावर झळकवले जात आहे. वास्तविक तो किती क्रूर आहे हे चित्र पॉडकास्टच्या माध्यमातून सांगितले जाणे आवश्यक होते. पण नव्या पिढीला त्याच्याबद्दल कुतूहल वाटावे असे वातावरण सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण केले जाणे हे अतिशय दुर्दैवी आहे. दोन दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी देशाच्या अनेक भागातून 11 दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. विजय शूटर, नीतीश पासवान, नावेद, तौकीर, अरबाज, हरविंदर, मनजीत अशी दाऊद इब्राहिम टोळीतील दहशतवाद्यांची नावे आहेत. हे दहशतवादी दाऊद इब्राहिम च्या टोळीतील असले तरी ते आय एस आय संघटनेच्या आदेशावरून अनेक दहशतवादी हल्ले करण्याच्या तयारीत होते. त्यांच्याकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत त्यांनी दाऊद इब्राहिम आणि आयएसआय संघटनेचे नाव घेतले आहे.

भारतामध्ये झालेल्या प्रत्येक दहशतवादी हल्ल्यामागे दाऊद इब्राहीम याचा हात होता हे अनेकदा सिद्ध झाले आहे, स्पष्ट झाले आहे. पण अलीकडच्या गेल्या काही वर्षात ज्या दहशतवादी कारवाया झाल्या त्यामध्ये दाऊद इब्राहिम याचे नाव पुढे आलेले नव्हते. आता त्याचे नाव मुंबई आणि नवी दिल्ली येथील नियोजित दहशतवादी हल्ल्या मागचा मेंदू म्हणून घेतले जात आहे. (moving) त्यातून दाऊद इब्राहिम हा आय एस आय साठी अजूनही तितक्याच तडफेने सक्रिय आहे असा एक संदेश भारतीयांना द्यायचा होता. धुरंदर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात दाऊद विषयी केलेले चित्रण खोटे आहे असेही आय एस आय ला सांगावयाचे दिसते. गेल्या आठवड्यात मुंबईतील बांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील “गरीब नगर” हे भुईसपाट करण्यात आले. या झोपडपट्टी 95% मुस्लिम होते आणि ते भारतीय नव्हते. त्याचा बदला दहशतवादी हल्ले करून घेतला जाणार होता. दहशतवाद्यांच्या रडारवर मुंबई पोलीस होते अशी माहिती प्राथमिक चौकशीत पुढे आली आहे. मुंबईतील आणखी काही रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या झोपडपट्ट्या भुई सपाट करण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही असा सुद्धा एक संदेश या संशयीत दहशतवाद्यांना द्यावयाचा असावा असे दिसते.

मुंबईतील काही महत्त्वाचे उड्डाणपूल, मुंबई पोलीस,(moving) तसेच नवी दिल्ली येथील शासकीय इमारती, गर्दीची ठिकाणे यांची या दहशतवाद्यांनी रेकी केली होती. दिल्ली पोलीस सतर्क नसते तर अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले असते. दाऊद टोळीचा आणि आयएसआय संघटनेचा हा एक व्यापक कट उधळून लावल्याबद्दल नवी दिल्ली पोलिसांचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे. गरीब नगर भुईसपाट केल्याचा बदला
घेण्यासाठी कट रचने म्हणजे त्या झोपडपट्टीत असामाजिक घटक राहत होते हे स्पष्ट झाले आहे. ही झोपडपट्टी भुई सपाट केल्याबद्दल ज्यांनी सरकार विरोधी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्यांना त्या झोपडपट्टीमधील वास्तव समजायला हरकत नाही. दाऊद इब्राहिम ने मुंबई सोडून जवळपास 36 वर्षे होऊन गेली आहेत. आज त्याचे वय 75 च्या पुढे असावे. त्यामुळे त्याच्या चेहरेपट्टीत बराचसा फरक पडलेला असेल. त्यामुळे त्याला प्रत्यक्ष मुंबईत पाहिलेल्या अनेकांना आता तो ओळखतासुद्धा येणार नाही. पण त्याचे आदेश पाळणारे स्लीपर सेल मुंबई सह काही भागात असल्याचे या निमित्ताने उघड झाले आहे. त्याच्या या पिल्लावळीला नवी दिल्ली पोलिसांनी अटक करून आय एस आय संघटनेला
जबरदस्त संदेश दिलेला आहे असे म्हणता येईल.

हेही वाचा :

बेटिंगसाठी साडेसहा कोटींना वेबसाईट?

गोकुळ निवडणुकीसाठी 2 हजार ठराव गोळा करा

1948 ते 2026… अशी बदलत गेली एसटी!