आधार लिंक न केल्याने संजय गांधी योजनेचे १२ हजार लाभार्थी वंचित

पुणे : पुणे जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेच्या (yojana)सुमारे १२ हजार १६६ लाभार्थ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले नसल्याने त्यांना मासिक अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे. राज्य सरकारकडून ६५ वर्षांखालील निराधार व्यक्ती, घटस्फोटित महिला आणि अपंगांना या योजनेंतर्गत दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. गरजू व्यक्तींना आर्थिक मदत देणे हा या योजनेचा उद्देश आहे. जिल्ह्यात एक लाख ९ हजार १८९ पात्र लाभार्थी आहेत. मात्र, त्यापैकी १२ हजारांहून अधिक जणांनी आधार कार्ड लिंक न केल्यामुळे त्यांना या मदतीचा लाभ मिळू शकलेला नाही. जिल्हा प्रशासनाने या सर्व लाभार्थ्यांना त्यांचे आधार कार्ड त्वरित लिंक करण्याचे आवाहन केले आहे.

महसूल सप्ताहांतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’(yojana) राबविले जात आहे. या अभियानांतर्गत प्रशासनाचे कर्मचारी घरोघरी जाऊन आधार कार्ड लिंक नसलेल्या संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना मदत करत आहेत

असे करा आधार लिंक
जवळच्या आधार केंद्रावर जाऊन तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करा. या प्रक्रियेला साधारणतः तीन दिवस लागतात. त्यानंतर तुमच्या बँक शाखेत जाऊन आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या. बँक खाते आणि मोबाईल नंबर आधारशी जोडल्यानंतर संबंधित तहसील कार्यालयात जाऊन त्याची माहिती द्या.

तसे केल्यास बंद झालेल्या योजनेचा लाभ मिळण्यास(yojana) अडचण येणार नाही. जर योजनेत नव्याने समाविष्ट व्हायचे असेल, तर तहसील कार्यालयात जाऊन संबंधित कागदपत्रे देऊन अर्ज भरू शकता, असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा :

भारताला शेजाऱ्यांचा फटका, ‘या’ देशात ईव्हीची मागणी वाढली
तुमच्या शहरात काय आहेत आजचे सोन्याचांदीचे दर? एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही
श्रावण महिन्यातील उपवासाला सकाळच्या नाश्त्यात बनवा कुरकुरीत मेदू वडे, दह्याच्या चटणीसोबत लागतील सुंदर