LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी सरकारचा नवा प्लॅन जाणून घ्या?

देशात एलपीजी वापरासंदर्भातील नियमांमध्ये वेळोवेळी बदल होत असतात. आता लहान व्यावसायिक आणि मर्यादित गॅस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी मोठा दिलासा देणारा प्रस्ताव पुढे आला आहे. इंडियन ऑइल , भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्या 10 किलो वजनाच्या हलक्या कंपोझिट एलपीजी सिलेंडरचा व्यावसायिक वापरासाठी विस्तार करण्याच्या तयारीत आहेत.

लहान व्यावसायिकांसाठी हलक्या सिलेंडरचा प्रस्ताव सध्या बाजारात 19 किलो, 5 किलो आणि 2 किलो क्षमतेचे कमर्शियल एलपीजी सिलेंडर उपलब्ध आहेत. मात्र 19 किलोचा सिलेंडर वजनाने जड असल्याने त्याची वाहतूक करणे अनेकांसाठी अवघड ठरते. विशेषतः चहाच्या टपऱ्या, फूड स्टॉल, लहान कॅफे, हातगाडीवरील विक्रेते (LPG) तसेच भाड्याच्या घरात राहणारे नागरिक यांच्याकडून हलक्या सिलेंडरची मागणी सातत्याने होत होती. ही गरज लक्षात घेऊन तेल कंपन्या 10 किलो क्षमतेचा कंपोझिट सिलेंडर व्यावसायिक ग्राहकांसाठी उपलब्ध करण्याचा विचार करत आहेत. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास कमी प्रमाणात गॅस वापरणाऱ्या ग्राहकांना अधिक सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहे. विशेषतः 19 किलोचे सिलेंडर उचलताना अडचण येणाऱ्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो.

कंपोझिट टेक्नॉलॉजीमुळे वजन कमी नवीन 10 किलोचा सिलेंडर एचडीपीई आधारित आधुनिक कंपोझिट तंत्रज्ञानाने तयार करण्यात आला आहे. पारंपरिक स्टील सिलेंडरच्या तुलनेत तो जवळपास 50 टक्के हलका असल्यामुळे (LPG) त्याची वाहतूक आणि वापर अधिक सुलभ होणार आहे. पायऱ्यांवरून वर नेणे, लहान दुकानांमध्ये ठेवणे किंवा रोजच्या वापरासाठी तो अधिक सोयीचा ठरेल.या सिलेंडरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा बाहेरील भाग पारदर्शक आहे. त्यामुळे कोणतेही अतिरिक्त उपकरण न वापरता सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, हे सहज पाहता येते. त्यामुळे वेळेवर रिफिल करता येण्यास मदत होते. सध्या हा सिलेंडर मर्यादित प्रमाणात घरगुती ग्राहकांसाठी उपलब्ध असून एचपीसीएल तो HP Gas Ojas, इंडियन ऑइल तोआणि बीपीसीएल तो या नावांनी विकत आहे. आता ही सुविधा व्यावसायिक ग्राहकांपर्यंतही पोहोचवण्याची तयारी सुरू आहे.

सध्या दिल्ली येथे 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 942 रुपये आहे. 19 किलो कमर्शियल सिलेंडर सुमारे 2,930 रुपयांना उपलब्ध आहे, तर 5 किलो कमर्शियल सिलेंडरची किंमत 808.50 रुपये आहे. 10 किलो कमर्शियल कंपोझिट सिलेंडरची अधिकृत किंमत अद्याप जाहीर झालेली नसली, तरी ती 5 किलो आणि 19 किलो सिलेंडरच्या किमतीच्या (LPG) दरम्यान असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.हा प्रस्ताव मंजूर झाल्यास मर्यादित गॅस वापरणारे लहान व्यावसायिक, स्ट्रीट फूड विक्रेते, विद्यार्थी, भाड्याच्या घरात राहणारे नागरिक आणि प्रवासी मजूर यांना सर्वाधिक फायदा होईल. कमी वजनामुळे वाहतूक सुलभ होईल आणि रोजच्या वापरातही अधिक सोय उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा :

मिरज पंचायत समितीत पुढचा सभापती भाजपचा?

चीनला मोठा दणका, भारताजवळ बांधत होता धरण, ब्रह्यपुत्र नदीवर थेट?

उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का बसणार? 15 आमदार फुटणार?