मुंबई महापालिका शाळांतील बीएलओ म्हणून नियुक्त शिक्षकांना एसआयआर कामासाठी पूर्णवेळ कार्यमुक्त करावे, तसेच निवडणूक अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कथित एफआयआरच्या धमक्या आणि अयोग्य वर्तनावर कारवाई करावी, अशी मागणी महापालिका

बीएलओ शिक्षकांना एसआयआर कामासाठी पूर्णवेळ कार्यमुक्त करण्याची मागणी.निवडणूक अधिकाऱ्यांकडून कथित धमक्या व अयोग्य वर्तनाबाबत आक्षेप.शिक्षकांवरील दुहेरी जबाबदारीमुळे संभ्रम आणि मानसिक तणाव वाढल्याची तक्रार.बृहन्मुंबई महानगरपालिका प्राथमिक शाळांतील ज्या शिक्षकांना बीएलओ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे (Corporation) त्यांना एसआयआर कामासाठी शाळेतून पूर्ण वेळ कार्यमुक्त करा तसेच निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांकडून नियुक्त शिक्षकांना एफ आर आय दाखल करण्याबाबत येणाऱ्या सततच्या धमक्या आणि या शिक्षकांशी केल्याजाणाऱ्या अयोग्य वर्तनाबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी महापालिका शिक्षक सभेने पालिका शिक्षण उपायुक्त डॉक्टर प्राची जांभेकर यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांतील बीएल ओ म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांबाबत शिक्षण विभागाने परिपत्रक काढून शाळेचे अध्यापन कार्य सुरू ठेवत ठराविक कालावधीत एसआयआरचे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Corporation) परंतु प्रत्यक्षात परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे.शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकाची माहिती निवडणूक विभागाला नाही का? असा प्रश्न विचारत जर माहिती नसेल तर दोन्ही विभागांमध्ये समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. या विरोधाभासी सूचनांमुळे शिक्षकांमध्ये संभ्रम व मानसिक तणाव निर्माण झाला असून शाळेचे काम आणि एसआयआरचे काम एकाच वेळी प्रभावीपणे करणे अत्यंत कठीण झाले असल्याचे शिक्षक सभेने आपल्या पत्रात म्हटले आहे.
एकूणच परिस्थिती पाहता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढून बीएलओ म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या सर्व शिक्षकांना तत्काळ शाळेच्या कामकाजातून कार्यमुक्त करून केवळ एसआयआर चे काम सोपवण्यात यावे, जेणेकरून सुरू असलेला संभ्रम व अनावश्यक वाद कायमचा संपुष्टात येईल. (Corporation) तसेच निवडणूक विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात याव्यात की, त्यांनी शिक्षकांशी सन्मानपूर्वक व सभ्य भाषेत संवाद साधावा. भविष्यात कोणत्याही शिक्षकाशी अरेरावी अपमानास्पद भाषा किंवा एफआरआयची धमकी देण्याचे प्रकार घडू नयेत, अशी अपेक्षाही शिक्षक सभेने आपल्या पत्रातून व्यक्त केली आहे.
हेही वाचा :
मिरज पंचायत समितीत पुढचा सभापती भाजपचा?
चीनला मोठा दणका, भारताजवळ बांधत होता धरण, ब्रह्यपुत्र नदीवर थेट?