भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) लवकरच १० आणि २० रुपयांच्या नोटांमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. पण सध्या कागदी नोटा बंद करण्याचा कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. RBI ची नोटा छापणारी कंपनी भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड यांनी प्लास्टिक नोटांसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी जागतिक स्तरावर ‘एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट’ (EOI) मागवला आहे. (Bank of India) त्यामुळे प्लास्टिकच्या नोटांचा प्रकल्पाची हालचाल होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

सुरुवातीला १० आणि २० रुपयांच्या नोटांची पायलट चाचणी घेतली जाऊ शकते. या नोटा प्लास्टिक किंवा पॉलिमर फिल्मवर छापल्या जातात. त्यामध्ये असलेली पारदर्शक सुरक्षा विंडो आणि आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे बनावट नोटा तयार करणं जास्त कठीण होतं. तसेच या नोटा पाण्यामुळे खराब होत नाहीत, (Bank of India) लगेचच फाटत नाहीत आणि कागदी नोटांच्या तुलनेत अडीच ते चारपट जास्त टिकाऊ असल्याचं मानलं जातं.
RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ५ जून २०२६ रोजी स्पष्ट केलं होतं की, पॉलिमर नोटांचा प्रस्ताव अजून सुरू आहे. अजून त्यावर कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही. भारतात पॉलिमर नोटांचा प्रस्ताव नवीन नाही. २००९ पासून या विषयावर सुरू आहेत. या विषयावर चर्चा सुरू असून २०१२ मध्ये १० रुपयांच्या पॉलिमर नोटांची चाचणी घेण्याला मंजुरी दिलेली होती. मात्र तांत्रिक आणि कार्यालयातील काही अडचणींमळे हा प्रकल्प पुढे जाऊ शकला नव्हता. तज्ज्ञांच्या मते, देशात ऑनलाइन व्यवहार वाढले असले तरी चलनाचीही मागणी तितकीच आहे. त्यामुळे जास्त टिकाऊ आणि सुरक्षित नोटांचा पर्याय म्हणून पॉलिमर नोटांचा विचार केला जातो. पण या नोटांसाठी एटीएम, नोट मोजणी यंत्रणा आणि वेगवेगळ्या प्रणालींमध्ये बदल करावे लागू शकतात. (Bank of India) त्यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पॉलिमर नोटा टप्प्याटप्प्याने चलनात आणल्या जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
पेट्रोल डिझेल स्वस्त झालं की महाग? वाचा आजचे लेटेस्ट रेट?