कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात असलेल्या बाराशे वर्षांपूर्वीच्या कारंजाच्या ढाच्याला असलेले दगड पहाटेच्या सुमारास काढण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. (Ambabai Temple) अज्ञातांनी हे दगड काढून नेल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर हे असंख्य भक्तांचं श्रद्धास्थान आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचं आद्यपीठ अणाऱ्या अंबाबाई मंदिराबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर येत आहे. 1200 वर्षे जुन्या कारंजाच्या ढाच्यातील दगड काढून नेण्यात आलं आहे. परिसरात असलेल्या बाराशे वर्षांपूर्वीच्या कारंजाच्या ढाच्याला असलेले दगड पहाटेच्या सुमारास काढण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अज्ञातांनी हे दगड काढून नेल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. (Ambabai Temple) याप्रकरणी आता अधिक चौकशी करण्यात येत आहे.
सांगायचं झालं, मंदिराचा मूळ ढाचा आणि कारंजे यांसारख्या प्राचीन रचनांवर दख्खनच्या काळ्या बेसाल्ट खडकाचा वापर करण्यात आला आहे. हे दगड अतिशय टणक आणि टिकाऊ आहेत. (Ambabai Temple) दरम्यान, अंबाबाई मंदिराच्या संरक्षणाच्या प्राधान्याबाबत गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित असलेली अंतिम अधिसूचना येत्या 15 दिवसांत काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने राज्य सरकारला दिले आहेत. न्यायमुर्ती वृषाली जोशी आणि न्यामुर्ती संदीप पाटीव यांच्या बेंचसमोर गजाजन विश्वनाथ मुनिश्वर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 20 जुलै रोजी सुनावणी झाली.
हेही वाचा :
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?
सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?