सुकलेले कारले फेकून देत आहात? सावधान, अनेक आरोग्य

आरोग्यासाठी उपयुक्त मानल्या जाणाऱ्या कारले या भाजीचे फायदे सर्वश्रुत आहेत. मात्र, अनेकदा दुर्लक्षित केलं जाणारं सुकलेलं कारलेही तितकंच किंबहुना काही बाबतीत अधिक फायद्याचं ठरत असल्याची माहिती समोर येत आहे. रोजच्या आहारात याचा योग्य पद्धतीने समावेश केल्यास अनेक आरोग्य समस्यांवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं.

बहुतेक लोक ताजं कारलं वापरतात, पण सुकलेली कारली मात्र फेकून देण्याची सवय दिसते. प्रत्यक्षात सुकवलेल्या कारल्यातही पोषक घटक टिकून राहतात. (health) विशेषतः त्याचा रस किंवा भिजवलेलं पाणी नियमित घेतल्यास शरीरावर सकारात्मक परिणाम दिसून येतो.

तज्ज्ञांच्या मते, सुकलेल्या कारल्यात चारॅन्टिन आणि इन्सुलिनसारखे गुणधर्म असलेले घटक आढळतात, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. (health) त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हे विशेष लाभदायक ठरू शकतं. नियमित सेवन केल्याने शरीरातील ग्लुकोज चयापचय सुधारण्यास मदत होते.यासाठी अनेकजण सुकलेलं कारलं रात्री पाण्यात भिजत ठेवतात आणि सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी पितात. ही पद्धत शरीरातील साखरेचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त मानली जाते. रिकाम्या पोटी सेवन केल्यास त्याचा प्रभाव अधिक चांगला जाणवतो, असंही सांगितलं जातं.

आश्चर्याची बाब म्हणजे सुकलेल्या कारल्याचा रस हा ताज्या कारल्याच्या तुलनेत कमी कडू लागतो, त्यामुळे अनेकांना तो सहज पचतो आणि नियमितपणे घेणं सोपं होतं.(health) यामुळे आरोग्य सुधारण्यासाठी हा एक सोपा आणि प्रभावी पर्याय ठरू शकतो. एकंदरीत, सुकलेलं कारलं फेकून देण्याऐवजी त्याचा आहारात योग्य वापर केल्यास आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. मात्र, कोणताही घरगुती उपाय सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक असल्याचंही तज्ज्ञ सुचवतात.

हेही वाचा

हादरवणारी घटना; आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे कोणती?

आता मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश; मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय