सनरायजर्स हैदराबाद ने दमदार कामगिरी करत दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 47 धावांनी शानदार विजय मिळवला. या सामन्यात अभिषेक शर्मा याने केलेल्या तुफानी शतकी खेळीने सामन्याचं पारडं हैदराबादकडे झुकवलं, तर एशान मलिंगा याने घेतलेल्या 4 विकेट्सने विजयावर शिक्कामोर्तब केलं.

मंगळवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करत धडाकेबाज 242 धावा उभारल्या. (Delhi) अभिषेक शर्मा याने नाबाद 135 धावांची खेळी करत प्रतिस्पर्धी गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. या भक्कम धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सला 20 षटकांत 195 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
या विजयासह हैदराबादने स्पर्धेतील चौथा विजय नोंदवला असून गुणतालिकेत थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. विशेष म्हणजे, 200 पेक्षा अधिक धावा करून सामने जिंकण्याच्या बाबतीत हैदराबादची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. (Delhi) त्यांनी आतापर्यंत 24 वेळा प्रथम फलंदाजी करत 200 हून अधिक धावा केल्या असून त्यापैकी तब्बल 20 वेळा विजय मिळवला आहे.
या विक्रमांच्या यादीत चेन्नई सुपर किंग्स अव्वल स्थानावर असून त्यांनी 29 वेळा 200 पेक्षा जास्त धावा करताना 23 सामने जिंकले आहेत. (Delhi) तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी 30 पैकी 23 सामने जिंकले आहेत.एकूणच, अभिषेक शर्मा आणि गोलंदाजांच्या एकत्रित कामगिरीमुळे हैदराबादने हा सामना एकतर्फी करत स्पर्धेत आपली दावेदारी आणखी मजबूत केली आहे.
हेही वाचा
हादरवणारी घटना; आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार
कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे कोणती?
आता मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश; मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय