कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे कोणती?

कॅन्सरच्या वाढत्या घटनांमुळे (warning)आरोग्य तज्ञांकडून सतर्क राहण्याचा इशारा दिला जात आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कॅन्सरची लक्षणे ओळखणे कठीण असले तरी काही संकेत वेळेत लक्षात घेतले तर जीव वाचू शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, शरीरात अचानक होणारे बदल दुर्लक्षित करू नयेत.

सतत थकवा जाणवणे, (warning)कारण नसताना वजन कमी होणे, किंवा भूक न लागणे ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात. काही रुग्णांमध्ये वारंवार ताप येणे किंवा शरीरात वेदना राहणे देखील दिसून येते.त्वचेवर नवीन गाठ तयार होणे किंवा जुन्या गाठीचा आकार वाढणे हा एक महत्त्वाचा इशारा मानला जातो. तसेच, त्वचेचा रंग बदलणे, जखम लवकर न भरून येणे किंवा ती वाढत जाणे हेही धोक्याचे संकेत असू शकतात.तोंड, घसा किंवा पचनसंस्थेशी संबंधित त्रासही सुरुवातीला दिसू शकतो. सतत खोकला येणे, आवाज बसणे, गिळताना त्रास होणे किंवा पोटात अस्वस्थता जाणवणे याकडे दुर्लक्ष करू नये, असे तज्ज्ञ सांगतात.

महिलांमध्ये स्तनात गाठ (warning)जाणवणे, स्तनाच्या आकारात किंवा त्वचेत बदल होणे, तर पुरुषांमध्ये लघवीच्या सवयींमध्ये बदल होणे हे देखील महत्त्वाचे संकेत असू शकतात.तज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे की, ही लक्षणे दिसल्यास घाबरण्याची गरज नाही, पण वेळ न दवडता तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. वेळेत निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरू शकतात आणि जीव वाचण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.