आज 7 मे 2025, बुधवार, वैदिक पंचांगानुसार एक अत्यंत शुभ दिवस ठरतोय. वैशाख शुक्ल नवमी आणि बुधवारचा योग, शिवाय गुरु आणि चंद्र यांचा चतुर्थ-दशम योग जुळून आल्यामुळे गजकेसरी योग तयार झाला आहे. यासोबत शुक्र उच्च राशीत असल्याने मालव्य राजयोगही निर्माण झाला आहे. हे योग विशेषतः 5 राशींसाठी(zodiac signs)अत्यंत लाभदायक ठरणार आहेत.

मेष राशी – पैसे, प्रगती आणि समाधान :
आजचा दिवस मेष राशीसाठी(zodiac signs) फारच लाभदायक आहे. व्यवसाय, नोकरी किंवा आर्थिक व्यवहारांमध्ये यशाची शक्यता आहे. सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी ही वेळ फायदेशीर असून, बिझनेस मॅनेजमेंट किंवा अकाउंट्सशी संबंधित लोकांना विशेष प्रगतीची संधी मिळेल. घरातील वातावरणही आनंददायक राहील.
सिंह राशी – मान-सन्मान, लक्ष्मी कृपा :
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. विविध स्रोतांतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. समाजात प्रतिष्ठा वाढेल आणि देवी लक्ष्मीची कृपा लाभेल. विवाहित लोकांच्या नात्यांमध्ये जिव्हाळा वाढेल आणि धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.
वृश्चिक राशी – गुंतवणुकीला अनुकूल वेळ :
वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आजच्या दिवशी आर्थिक गुंतवणुकीवर भर द्यावा. हे पाऊल भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. घरात शांतता व समाधान राहील. संध्याकाळ धार्मिकतेत घालवली तर मानसिक स्थैर्य लाभेल.

तूळ राशी – उत्पन्नवाढ आणि व्यवसाय विस्तार :
तूळ राशीच्या अकराव्या स्थानात चंद्र असल्यामुळे उत्पन्नात वाढ दिसून येईल. जुन्या वादांवर तोडगा निघेल आणि व्यवसायाच्या विस्तारासाठी चांगले संकेत मिळतील. मित्रांकडून मानसिक आणि व्यावसायिक पातळीवर मदतीची अपेक्षा ठेऊ शकता.
मकर राशी – भौतिक सुख, प्रमोशन व वैवाहिक सौख्य :
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सुखसमृद्धीचा आहे. वाहनसुख, प्रमोशन आणि व्यावसायिक यशाचे योग आहेत. विवाहित लोकांना नात्यात नवीन उभारी मिळेल आणि जीवनात सकारात्मक बदल घडतील.
हेही वाचा :
जय हिंद! भारताने घेतला पहलगामचा बदला; पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर Air Strike
Jio ग्राहकांसाठी खास भेट! लोकप्रिय ऑफरला कंपनीनं पुन्हा दिली मुदतवाढ
स्वतःहून अमेरिका सोडा अन् 1000 डॉलर मिळवा; ट्रम्प सरकारची अवैध प्रवाशांना खास ऑफर