जंतर-मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस आक्रमक सुनावले खडे बोल?

नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कन्या दिविजा फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन हा प्रत्येकाचा अधिकार असल्याचे सांगतानाच कोणत्याही प्रकारच्या हिंसेला समर्थन देता येणार नाही, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.

गेल्या 34 दिवसांपासून नीट पेपरफुटी प्रकरणावरून जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Divija Fadnavis) यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आंदोलनकर्ते ठाम असून सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये अद्याप कोणतीही यशस्वी चर्चा झालेली नाही. बुधवारी रात्री आंदोलनादरम्यान काही समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक आणि बाटल्या फेकल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर दिविजा फडणवीस यांनी सोशल मीडियावर आपले मत व्यक्त केले.

त्यांनी म्हटले की, लोकशाही व्यवस्थेत शांततेच्या मार्गाने आंदोलन करणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. मात्र, आंदोलकांकडून पोलिसांवर होणारी हिंसा किंवा पोलिसांकडून आंदोलकांवर होणारी हिंसक कारवाई या दोन्ही गोष्टी स्वीकारार्ह नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शैक्षणिक सुधारणांच्या मागणीला पाठिंबा देता येईल, (Divija Fadnavis) मात्र त्या मुद्द्यावर नेतृत्व करणाऱ्या राजकीय पक्षाची किंवा त्यांच्या विचारसरणीची माहिती न घेता आंधळेपणाने समर्थन करणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.

दिविजा फडणवीस यांनी नागरिकांना आणि विशेषतः तरुणांना सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले. केवळ एखादा विषय ट्रेंडमध्ये आहे म्हणून त्यामागे उभे राहू नका किंवा कोणत्याही विचारसरणीच्या प्रभावाखाली स्वतःची विचारशक्ती गमावू नका, असे त्यांनी म्हटले. विरोधी पक्षानेही केवळ सत्ताधारी पक्षावर टीका करण्याऐवजी देशहिताचा विचार करून सकारात्मक भूमिका घ्यावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

त्यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी होणारे आंदोलन योग्य आहे. मात्र, आंदोलनाचा विषय नीट , पेपरफुटी किंवा राष्ट्रीय परीक्षा संस्था यांसारख्या मूळ मुद्द्यांपासून दूर जाऊन धर्म किंवा इतर विषयांकडे वळत असेल, तर त्यामागील उद्देश बदलत असल्याचे समजून सावध राहण्याची गरज आहे. (Divija Fadnavis) दरम्यान, जंतर-मंतर येथील आंदोलनाचा 34 वा दिवस सुरू असून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी कायम ठाम आहेत. सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये अद्याप कोणतीही अधिकृत तोडगा निघालेला नसल्याने पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

हेरवाडमध्ये पाण्याच्या टाकीतून हजारो लिटर पाणी गळतीने वाया?

पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्यात ₹3000 ची वाढ होणार?

या 4 राशींसाठी शुभ ठरणार सूर्य गोचर, धनलाभ होणार?