गेल्या महिनाभरापासून आंदोलन शांततेत सुरू होते. या काळात कोणतीही अनुचित घटना घडली नव्हती. मात्र आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळू लागल्यानंतर परिस्थिती बदलली. आंदोलनात गोंधळ घालण्यासाठी आणि आंदोलकांना चिथावणी देण्यासाठी बाहेरून लोक पाठवले जात आहेत. (Abhijeet Deepke) गेल्या महिनाभरापासून आंदोलन शांततेत सुरू होते.

जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या NEET पेपरफुटीविरोधातील आंदोलनादरम्यान कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आपली प्रकृती बिघडल्याची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून तीव्र ताप आणि अंगदुखीचा त्रास होत आहे. वेदनाशामक औषधांमुळे काही दिवस आंदोलन सुरूच ठेवलं आहे, पण आता तातडीने डॉक्टरांच्या उपचारांची गरज असल्याचे अभिजीत यांनी म्हटले आहे.दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत यासंदर्भात की, “गेल्या काही दिवसांपासून मला ताप आणि शरीरात तीव्र वेदना आहेत. (Abhijeet Deepke) त्यामुळे आज मी जंतर-मंतरवर दिसलो नाही, तर त्याबद्दल क्षमस्व. प्रकृती सुधारण्यासाठी काही तास विश्रांती घेणे आवश्यक आहे. संध्याकाळपर्यंत मी पुन्हा आंदोलनस्थळी परत येईन.”
बुधवारी रात्री जंतरमंतरवर झालेल्या हिंसाचारांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना अभिजीत दीपके यांनी संताप व्यक्त केला. आंदोलनात जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करण्यासाठी भाजपकडून बाहेरून गुंड पाठवले जात आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडूनच आंदोलनात घुसखोरी करून दगडफेक करून आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा आरोप आरोप केला.दीपके म्हणाले, “गेल्या महिनाभरापासून आंदोलन शांततेत सुरू होते. या काळात कोणतीही अनुचित घटना घडली नव्हती. मात्र आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळू लागल्यानंतर परिस्थिती बदलली. आंदोलनात गोंधळ घालण्यासाठी आणि आंदोलकांना चिथावणी देण्यासाठी बाहेरून लोक पाठवले जात आहेत.”
“दगडफेक करणारे हे भाजपचे लोक, भाजपचे समर्थक आहेत. पोलिस घटनास्थळी दगडांनी भरलेले ट्रक आणतात. त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते दगडफेक करून CJP कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात.” असा आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे. (Abhijeet Deepke) तसेच आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेला लाठीमार अत्यंत क्रूर होता, असा आरोप करत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे अभिजीत दिपके यांनी सांगितले.दीपके यांनी सांगितले की, “लाठीमाराबाबत मी यापूर्वीही भूमिका मांडली आहे. तो अत्यंत क्रूर होता. या कारवाईस जबाबदार असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. आंदोलनाचा गुरुवारी 34 वा दिवस असून सोनम वांगचुक यांचे उपोषण 26 व्या दिवशीही सुरू आहे. “आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले. अभिजीत दीपके यांनी केलेल्या भाजप आणि पोलिसांवरील आरोपांबाबत संबंधित यंत्रणांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
हेही वाचा :
हेरवाडमध्ये पाण्याच्या टाकीतून हजारो लिटर पाणी गळतीने वाया?