वांगचुक यांनी उपोषण सोडताच,अभिजीत दीपकेंनी आभार मानले?

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तरुणांचं आंदोलन (Wangchuk)मोदी सरकार देखील गांभीर्याने घेताना दिसत आहे. या आंदोलनादरम्यान नवी दिल्लीत मध्यरात्री मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात सोनम वांगचुक यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत 26 दिवसांनी उपोषण सोडलं.

सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर(Wangchuk) अभिजीत दीपके यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतरही आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.अभिजीत दीपके यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत भूमिका स्पष्ट केली.

अभिजीत दीपके यांनी म्हटलं की,सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचं शांततापूर्ण (Wangchuk)मार्गाने सुरू राहील. केंद्रीय शिक्षणमंत्री राजीनामा देत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील.’. त्यामुळे वांगचुक यांचं उपोषण संपुष्टात आल्यानंतरही कॉक्रोच जनता पक्षाचं आंदोलन सुरू राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा :

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?

सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?

रोहित शर्मा रिटायर होणार? टीम इंडियाच्या कोचने दिल उत्तर?