अपात्र महिलेंकडून 11 कोटी रुपये वसूल , 23 कोटी लाटणाऱ्या पुरुषांवर कारवाई कधी?

राज्यातील ‘लाडकी बहिण’ योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले असून, सरकारने आता अपात्र लाभार्थ्यांकडून वसुलीचा धडाका लावला आहे. डिसेंबर 2025 मध्ये करण्यात (recovery) आलेल्या ई-केवायसी आणि अर्ज पडताळणीतून हजारो बोगस लाभार्थ्यांचा भांडाफोड झाला आहे. विशेष म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि कर भरणाऱ्या महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, एकूण 12 हजार 915 महिला लाभार्थी अपात्र ठरल्या आहेत. त्यापैकी 6 हजार 457 महिलांकडून आतापर्यंत सुमारे 11 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. या कारवाईमुळे प्रशासनाने गैरवापरावर लगाम लावण्याचा प्रयत्न सुरू केला असला, तरी यामागील धक्कादायक बाब म्हणजे हजारो सरकारी महिला कर्मचाऱ्यांचाही यात सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

सुमारे 2,652 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी अपात्र असूनही योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले असून, त्यांनी मिळून 3 कोटी 58 लाख रुपयांचा गैरवापर केला आहे. तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांनी घेतलेली ही रक्कम आता त्यांच्या पगारातून हप्त्यांद्वारे वसूल केली जात आहे. याशिवाय, शिस्तभंग कारवाई म्हणून त्यांच्या एका वेतनवाढीवरही स्थगिती आणण्यात आली आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून महिलांकडून वसुली सुरू असताना, या योजनेत घुसखोरी करून लाभ घेतलेल्या पुरुष लाभार्थ्यांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नाही. केवळ महिलांसाठी असलेल्या या योजनेचा गैरफायदा घेत कोट्यवधी रुपयांची लूट करणाऱ्या पुरुषांवर कडक कारवाई कधी होणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

महिला व बालकल्याण विभागाकडून या संदर्भात अद्याप स्पष्ट भूमिका समोर आलेली नसल्याने सरकारच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपात्र महिलांवर कठोर कारवाई करताना, पुरुष लाभार्थ्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची टीका होत असून, यामुळे शासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा

मुली नकार द्यायच्या, लग्नच जुळेना, प्रचंड नैराश्यातून दोन तरूणांनी… त्या घटनेने महाराष्ट्र हादरला

अखेर ४८ तासांनी इराणने अमेरिकेचा मोठा बदला घेतला, होर्मुझमध्ये खळबळ, एकाच्या बदल्यात तीन

शिल्पा शेट्टीच्या बहिणीचं राकेश बापटसोबत ब्रेकअप, शमिता म्हणालेली, ते आयुष्याचं एक पान