राहुल गांधींनी बिहारमधील आंदोलनकारी विद्यार्थ्यांवर AK-47 ने गोळीबार केल्याचा आणि दिल्लीत पेलेट गन वापरल्याचा गंभीर आरोप केला आहे. मोदी सरकार विद्यार्थ्यांशी ‘निर्घृण’ वागत असून, त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी राहुल गांधींनी केली, ज्याला पवन खेरा यांनीही पाठिंबा दिला.

बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध एके-४७ (AK-47) चा वापर करण्यात आला; राहुल गांधींनी भाजप सरकारवर विद्यार्थ्यांबाबत ‘निर्घृण’ वागणूक दिल्याचा आरोप केला. बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर एके-47 मधून गोळीबार करण्यात आला, तर दिल्लीत आंदोलकांविरुद्ध पेलेट गन्सचा वापर करण्यात आला, असं त्यांनी म्हटलंय. बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी संपूर्ण यंत्रणा काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
विद्यार्थ्यांची अटक, एफआयआर आणि त्यांच्यावर झालेल्या कथित कारवाईचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विद्यार्थ्यांवरील कारवाई तात्काळ थांबवण्याची आणि या प्रकरणातील जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वरील पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली. “विद्यार्थ्यांविरोधात संपूर्ण व्यवस्था उभी करण्यात आली आहे. बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर AK-47 मधून गोळीबार झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. (Rahul Gandhi) तसेच शेकडो विद्यार्थ्यांना अटक करून एफआयआर दाखल करण्यात येत आहेत.” अस आरोप त्यांनी केला.
“बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर AK-47 ने गोळीबार करण्यात आला. शेकडो विद्यार्थ्यांना अटक करून त्यांच्यावर एफआयआर दाखल केली जात असल्याची बातमी येत आहे. मोदीजी, विद्यार्थ्यांवर एफआयआर दाखल होणार नाही, हे तुमचं आश्वासन कुठे गेलं ? ” असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला. बिहार असो की दिल्ली, प्रत्येक ठिकाणी एकच पद्धत दिसत आहे, हे सरकार खोटं आहे. सुधारणा करणं यांच्या आवाक्याबाहरेचं आहे. हे स्वत:च्याच शब्दांपासून मागे हटतील आणि प्रत्येक मार्गाने विद्यार्थ्यांचा आवाज दाबतील, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना प्रश्न विचारत विद्यार्थ्यांवर एफआयआर न करण्याचे आणि (Rahul Gandhi) त्यांना मुक्त करण्याचे आश्वासन कुठे गेले, अशी विचारणा केली.
तर काँग्रेस नेते, राज्यसभा खासदार पवन खेरा हेही या मुद्यावरून आक्रमक झाले (Rahul Gandhi) असून त्यांनी राहुल गांधी यांच ट्विट हे रिट्विट केलं. ” मोदी सरकारने देशातील तरूणांविरोधात युद्ध पुकारलं. विद्यार्थ्यांवर आधी पॅलेट गनने गोळीबार करण्यात आला, आता AK-47. आंदोलकाविरोधात कोणतीही सूडबुद्धीने कारवाई केली जाणार नाही, हे आश्वासनही केवळ एक ‘जुमला’ सिद्ध झालं आहे. हे एक अविश्वासू सरकार आहे, असह्य राज्यकर्ते आहेत”, असं म्हणत पवन खेरा यांनी सरकारवर हल्ला चढवला.
हेही वाचा :
दिवसा होणार अंधार, ऑगस्ट महिन्यात मोठे सूर्यग्रहण, तब्बल इतके तास?
नीटनंतर MPSC चा महत्वाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा, संपूर्ण राज्यात खळबळ?