हरियाणवी मनोरंजन विश्वातून एक अतिशय दु:खद बातमी समोर आली आहे. उदयोन्मुख अभिनेत्री Divyanka Sirohi हिचं अवघ्या 30 व्या वर्षी निधन झालं असून तिच्या आकस्मिक (sad news) जाण्याने संपूर्ण इंडस्ट्री हादरली आहे. मंगळवारी रात्री अचानक तब्येत बिघडल्याने ही दुर्दैवी घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दिव्यांकाला संध्याकाळी चक्कर आल्याने ती घरातच कोसळली आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. कुटुंबीयांनी तातडीने तिला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दिव्यांका मूळची उत्तर प्रदेशातील बुलंदशहरची होती आणि सध्या ती गाझियाबादमध्ये कुटुंबासोबत राहत होती. तिने मेरठमधील चौधरी चरण सिंह विद्यापीठातून बीसीए आणि सिक्किममधून एमबीए शिक्षण पूर्ण केलं होतं. शिक्षणासोबतच तिने हरियाणवी मनोरंजन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दिवसभर तिची प्रकृती ठिक होती. तिने स्वतः स्वयंपाकही केला होता. मात्र संध्याकाळनंतर अचानक तिची तब्येत खालावली. रात्री उशिरा घरी परतलेल्या भावाने तिची गंभीर अवस्था पाहिली. तिचे हात-पाय आकडले होते आणि शरीर निळं पडल्यासारखं दिसत होतं. तिच्या डोक्याला सूजही आली होती. हृदयविकाराचा झटका किंवा अन्य कारणामुळे तिचा मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.
बुधवारी गाझियाबादमध्ये तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या निधनामुळे हरियाणवी इंडस्ट्रीत शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
हेही वाचा
मुली नकार द्यायच्या, लग्नच जुळेना, प्रचंड नैराश्यातून दोन तरूणांनी… त्या घटनेने महाराष्ट्र हादरला
अखेर ४८ तासांनी इराणने अमेरिकेचा मोठा बदला घेतला, होर्मुझमध्ये खळबळ, एकाच्या बदल्यात तीन
शिल्पा शेट्टीच्या बहिणीचं राकेश बापटसोबत ब्रेकअप, शमिता म्हणालेली, ते आयुष्याचं एक पान