लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी केवायसी दुरुस्तीबाबत महत्त्वाची अंतिम संधी उपलब्ध झाली आहे. केवायसी करण्याची मुदत संपल्यानंतरही अनेक महिलांनी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, तर (KYC) काहींनी केवायसी करताना चुकीची माहिती भरल्यामुळे त्यांचा लाभ तात्पुरता बंद करण्यात आला आहे. परिणामी, अशा महिलांना दरमहा मिळणारे १५०० रुपयांचे आर्थिक सहाय्य थांबले आहे.

राज्य सरकारने आता या महिलांना दिलासा देत ३० एप्रिलपर्यंत केवायसीमधील चुका दुरुस्त करण्याची शेवटची मुदत दिली आहे. या कालावधीत आवश्यक सुधारणा न केल्यास संबंधित महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थींनी ही संधी वाया घालवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
केवायसी दुरुस्ती करण्यासाठी महिलांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आधार क्रमांक आणि ओटीपीच्या माध्यमातून पडताळणी करावी लागणार आहे. त्यानंतर योग्य माहिती भरून प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. केवायसी पूर्ण झाल्यानंतर संबंधित माहितीची छाननी केली जाईल आणि पात्र लाभार्थींना पुन्हा योजनेचा लाभ सुरू करण्यात येईल.
दरम्यान, ज्या महिलांचा लाभ जानेवारीपासून बंद करण्यात आला आहे, त्यांना थकीत हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिलांनी विलंब न करता केवायसी दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक ठरणार आहे.
हेही वाचा
मुली नकार द्यायच्या, लग्नच जुळेना, प्रचंड नैराश्यातून दोन तरूणांनी… त्या घटनेने महाराष्ट्र हादरला
अखेर ४८ तासांनी इराणने अमेरिकेचा मोठा बदला घेतला, होर्मुझमध्ये खळबळ, एकाच्या बदल्यात तीन
शिल्पा शेट्टीच्या बहिणीचं राकेश बापटसोबत ब्रेकअप, शमिता म्हणालेली, ते आयुष्याचं एक पान