मेटाने फेसबुकवरुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा Video उडवला?

मेटाने फेसबुकवरून पंतप्रधान मोदींची पोस्ट काढून टाकल्याबद्दल माफी मागितली आहे. मेटाने म्हटले आहे की, तांत्रिक त्रुटीमुळे पंतप्रधानांचा व्हिडिओ काढून टाकण्यात आला होता. (Minister Modi) ही त्रुटी नंतर दुरुस्त करण्यात आली आणि काढून टाकलेला व्हिडिओ पुन्हा अपलोड करण्यात आला आहे.

मेटाने फेसबुकवरून पंतप्रधान मोदींची पोस्ट काढून टाकल्याबद्दल माफी मागितली आहे. मेटाने म्हटले आहे की, तांत्रिक त्रुटीमुळे पंतप्रधानांचा व्हिडिओ काढून टाकण्यात आला होता. ही त्रुटी नंतर दुरुस्त करण्यात आली आणि काढून टाकलेला व्हिडिओ पुन्हा अपलोड करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ भारतात फेसबुकवर तात्पुरता अनुपलब्ध झाला होता, (Minister Modi) ज्यामुळे सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली. व्हिडिओ उघडल्यावर, काही युजर्संना हा व्हिडिओ उपलब्ध नाही, असा संदेश दिसला. मात्र, त्यानंतर थोड्याच वेळात व्हिडिओ पुन्हा उपलब्ध करण्यात आला. मेटाने आता या प्रकरणी एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. मेटाच्या प्रवक्त्याने सांगितले, “हा व्हिडिओ चुकून काढून टाकण्यात आली होती आणि आता तो पुन्हा अपलोड करण्यात आला आहे.” कंपनीने स्पष्ट केले की व्हिडिओ काढून टाकणे ही एक तांत्रिक किंवा कार्यान्वयन त्रुटी होती आणि तो आता नेहमीप्रमाणे उपलब्ध आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 जुलै 2026 रोजी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला होता. मेटाने त्यांचा व्हिडिओ काढून टाकल्यामुळे (Minister Modi) अनेक राजकीय नेत्यांनी आक्षेप नोंदवला. हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला. पंतप्रधान मोदींनी हा व्हिडिओ सेल्फी मोडमध्ये रेकॉर्ड केला होता. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना संदेश देण्यासाठी त्यांनी या व्हिडिओचा वापर केला होता. मेटाच्या प्रवक्त्याने सांगितले, “व्हिडिओ चुकुन काढून टाकण्यात आला होता आणि ती आता तो अपलोड करण्यात आला आहे.” मेटाने या निवेदनात कोणत्याही सरकारी आदेशाचा किंवा कायदेशीर निर्देशाचा उल्लेख केलेला नाही.मोदी यांचा सेल्फीमेडमध्ये शूट केलेल्या व्हिडिओ खूप जास्त चर्चाही रंगली. हा व्हिडिओ सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला होता.

हेही वाचा :

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?

सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?

रोहित शर्मा रिटायर होणार? टीम इंडियाच्या कोचने दिल उत्तर?