शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर पण अट आवश्यक?

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 संदर्भात शेतकऱ्यांसाठी मोठी माहिती समोर आली आहे. (farmers) पहिल्या टप्प्यात 533 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झाल्यानंतर आता दुसऱ्या यादीत तब्बल 16 लाख 95 हजार शेतकऱ्यांचा समावेश असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे महत्त्वाचे आहे.

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफी योजनेबाबत शेतकऱ्यांना दिलासा देणारी माहिती दिली. अजितदादांची जयंती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलै रोजी राज्यातील 533 पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. आता दुसऱ्या यादीतील लाभार्थ्यांची संख्या स्पष्ट झाली आहे. (farmers) या योजनेची अंमलबजावणी तीन टप्प्यांमध्ये केली जाणार असून संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यासाठी ठरवलेल्या अटींची पूर्तता करण्यासोबत आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

दुसऱ्या यादीत 16 लाख 95 हजार शेतकऱ्यांचा समावेश असल्याचे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. कागदपत्रांची पूर्तता होत जाईल, त्यानुसार लाभार्थ्यांच्या याद्याही प्रसिद्ध केल्या जातील. योजनेच्या निकषांमध्ये बसणाऱ्या आणखी 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यादीत नाव आलेले नसले तरी शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही, कारण आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्यांचे नाव यादीत समाविष्ट होऊ शकते आणि त्यानंतर लाभ मिळेल, असे आश्वासन कृषिमंत्र्यांनी दिले.

या कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकूण 40 हजार कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. (farmers) थकीत कर्जापैकी दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम माफ केली जाणार आहे. कर्जमाफीच्या प्रक्रियेत काही तक्रारी किंवा त्रुटी आढळल्यास त्या दुरुस्त करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. योग्य कागदपत्रे सादर करून योजनेच्या अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले.दरम्यान, कर्जमाफीची प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली असून पात्र लाभार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर लाभ मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?

सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?

रोहित शर्मा रिटायर होणार? टीम इंडियाच्या कोचने दिल उत्तर?