काँग्रेसच्या रडारवर संघ?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

अपरिहार्य कारणातून स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल गेल्या अनेक वर्षांपासून उलट सुलट चर्चा होत आलेली आहे. विशेषतः राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने संघाला कायमच रडारवर घेतलेले आहे आणि आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बोलताना संघावर प्रहार केले आहेत. हे पहिल्यांदाच घडलेले नाही संसदे बाहेरही संघावर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी यापूर्वी हल्लाबोल केलेला आहे. मुळातच काँग्रेसच्या तुष्टीकरण धोरणाचा परिपाक म्हणजे संघाची स्थापना, हे आजच्या पिढीला माहीत नसावे.

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात नवी दिल्लीच्या जंतर मंतर रस्त्यावर झालेल्या जेसीपी च्या आंदोलनातील निदर्शकांच्या वतीने आंदोलनाचा मूळ विषय नसताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आणि तोच धागा पकडून देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. आजच्या शिक्षण व्यवस्थेवर संघाने कब्जा केला आहे. (Swayamsevak) त्यांनी शिक्षण व्यवस्था पोखरून काढली आहे. देशातील विद्यापीठांच्या कुलगुरू पदावर संघाच्या लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे त्यांनी गंभीर आरोप केले. अर्थात भाजपकडून त्यावर हरकत घेण्यात आली.

संघाचे बहुतांशी स्वयंसेवक हे ब्राह्मण समाजातून आलेले आहेत. त्यामुळे संघाकडून ब्राह्मणवाद स्वीकारला जातो आहे, ब्राह्मण्य स्वीकारले जाते आहे असा आरोप नेहमीच केला जातो. वास्तविक नेहमी होणाऱ्या या आरोपावर संघाच्या वरिष्ठांनी समाधानकारक खुलासा करणे गरजेचे आहे. सर संघ चालक डॉक्टर मोहन भागवत हे ब्राह्मणेतर व्यासपीठावरून अनेकदा व्यक्त होत असतात, संघाची वैचारिक व्यापकता स्पष्ट करत असतात, पण तरीही संघ म्हणजे ब्राह्मण हे समीकरण गेल्या शंभर वर्षात बदलले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे जगातील सर्वात मोठे संघटन आहे. संघाने सध्या शताब्दी ओलांडली आहे. संघामध्ये बहुजन समाजातील लोकही स्वयंसेवक आहेत. बहुजन समाजासाठी संघाने फार पूर्वीच दारे उघडलेली आहेत. पण तरीही संघावरचा ब्राह्मणी शिक्का पुसला जात नाही हे वास्तव आहे आणि संघ चालवणाऱ्यांचा पराभव सुद्धा आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच इसवी सन 1925 मध्ये डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्या काळात देशभर एकमेव संघटन असलेल्या काँग्रेसमध्ये काही नेत्यांच्याकडून अल्पसंख्यांक समाजाचे तुष्टीकरण केले जाते. काँग्रेसचे हे धोरण काँग्रेसमधील अनेकांना खटकत होते.तुष्टीकरणं धोरणामुळे काँग्रेस पासून हिंदू बाजूला जातील अशी भीती तेव्हा व्यक्त केली जात होती. (Swayamsevak) अशावेळी डॉक्टर केशव बळीराम हेडगेराव यांनी हिंदू हित साधण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्याला काँग्रेसच्या तत्कालीन काही नेत्यांचे अप्रत्यक्ष समर्थन होते. अल्पसंख्यांक समाजाचे हित पाहणाऱ्या 100 पेक्षा अधिक संघटना देशात आहेत, मात्र हिंदूंचे हित च रक्षण करणारी संघ ही एकमेव संघटना आहे असा साधार दावा केला जातो आहे.

काँग्रेस पक्षासह असे अनेक राजकीय पक्ष आहेत की त्यांनी संघाला ब्राह्मणवादी ठरवले आहे. विशेष म्हणजे ब्राह्मणेतर लोक भावनाही तशीच आहे.देशातील शिक्षण व्यवस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या कब्जात घेतली आहे, हे म्हणणे तर्काच्या पलीकडचे आहे. कारण राज्यातील आणि देशातील बहुतांशी मोठ्या शिक्षण संस्था या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या आहेत. (Swayamsevak) त्यामुळे या शिक्षण संस्थांवर संघाचा कब्जा आहे असे म्हणता येईल का? विद्यापीठांच्या कुलगुरू पदावर नियुक्ती करण्याची एक प्रक्रिया आहे आणि ती अनेक वर्षांपासूनची आहे. ही प्रक्रिया काँग्रेस राजवटीत होती आणि भाजपच्या राजवटीतही आहे. त्यामुळे देशातील सर्व विद्यापीठांवर भाजपचे कुलगुरू आहेत हा राहुल गांधी यांचा दावा मान्य करता येणार नाही. एक साधे प्रातिनिधिक उदाहरण द्यायचे झाले तर महाराष्ट्रात अनेक “अभिमत विद्यापीठे” आहेत. आणि एखादा दुसरा अपवाद वगळला तर ही विद्यापीठे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या अखत्यारीत आहेत. त्यामुळे तेथे कुलगुरू कोणत्या जातीचे आहेत हे मुद्दाम सांगण्याची गरज नाही.

हेही वाचा :

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?

सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?

रोहित शर्मा रिटायर होणार? टीम इंडियाच्या कोचने दिल उत्तर?