अकरावीत शिक्षण घेत असतानाच सोशल मीडियावर टेक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारा समर्थ जाधव?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील समर्थ जाधव हा अकरावीत शिक्षण घेत (Samarth Jadhav) असतानाच सोशल मीडियाच्या माध्यमातून तंत्रज्ञानविषयक माहिती, मोबाईल टिप्स, सरकारी योजना, ऑनलाइन सेवा आणि डिजिटल जगातील नवीन अपडेट्स मराठी भाषेत लोकांपर्यंत पोहोचवत आहे. कमी वयातच त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर सोशल मीडियावर वेगळी ओळख निर्माण केली आहे.

समर्थ जाधव या नावाने तो यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप चॅनल आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असून नियमितपणे माहितीपूर्ण व्हिडिओ आणि पोस्ट प्रकाशित करतो. (Samarth Jadhav) त्याचे व्हिडिओ विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त ठरत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शिक्षण आणि सोशल मीडिया या दोन्ही गोष्टींचा समतोल राखत समर्थ सातत्याने नवीन विषयांवर काम करत आहे. मोबाईलच्या नव्या ट्रिक्स, ऑनलाइन अर्ज, शासकीय योजनांची माहिती, डिजिटल सुरक्षितता आणि तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक विषय तो सोप्या मराठी भाषेत समजावून सांगतो.

हेही वाचा :

कमी वयात केस पांढरे होतायेत? 5 कारणे ठरू शकतात जबाबदार?

क्रिकेट विश्वात खळबळ इंग्लंड पराभवानंतर गंभीरसमोर ‘संजू’च्या घोषणा?

पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान?