नीट प्रकरणावर पंतप्रधान मोदी आक्रमक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांना दिला कानमंत्र?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए खासदारांसोबत झालेल्या बैठकीत पक्षातील जनप्रतिनिधींना महत्त्वाच्या सूचना दिल्या. लोकांशी सातत्याने संपर्क ठेवण्यापासून ते युवकांच्या समस्या समजून घेण्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच राजकीय विश्वासार्हता जपणे आणि सार्वजनिक जीवनात सावधगिरी बाळगण्याचाही सल्ला दिला.

बुधवारी एनडीएच्या 37 खासदारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील जबाबदाऱ्यांवर भर दिला. छोट्या चुका देखील मोठ्या संकटाचे कारण ठरू शकतात, त्यामुळे प्रत्येक निर्णय आणि कृती करताना काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अयोग्य व्यक्तींकडून होणारा पाहुणचार स्वीकारताना सावध राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला. तसेच अधिकृत लेटरहेड किंवा स्वाक्षरी चुकीच्या व्यक्तींच्या हातात पडणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश दिले.

राजकारणात विश्वास निर्माण करण्यासाठी (Narendra Modi) अनेक वर्षे लागतात, मात्र तो गमावण्यासाठी काही क्षण पुरेसे असतात, असे सांगत त्यांनी खासदारांना आपली प्रतिमा जपण्याचा सल्ला दिला. संसदेत नियमित उपस्थिती ठेवण्याबरोबरच मतदारसंघातील लोकांशी सातत्याने संपर्क ठेवणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांकडून टीका झाल्यास वाद घालण्याऐवजी संवादातून भूमिका मांडावी आणि लोकांचा विश्वास जिंकण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांबाबतही खास संदेश दिला. तरुणांचे प्रश्न समजून घेणे, (Narendra Modi) त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकणे आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी खासदारांना सांगितले. युवकांशी सातत्याने संवाद ठेवल्यास त्यांच्या अपेक्षा समजतील आणि त्यावर योग्य उपाययोजना करता येतील, असे त्यांनी नमूद केले. मतदारसंघात नियमित दौरे करून नागरिकांशी थेट संपर्क ठेवण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सरकार अधिक सतर्क झाल्याचे या बैठकीत दिसून आले. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता. (Narendra Modi) या आंदोलनात कॉकरोच जनता पार्टीने देशभरात आंदोलन उभारले होते आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी केली होती. अखेर वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिला. या घडामोडीनंतर युवकांच्या प्रश्नांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याचा संदेश पंतप्रधानांनी खासदारांना दिल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.

हेही वाचा :

पंकजा मुंडेंना पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर राजकारणात खळबळ?

व्यसनमुक्त असणाराच खरा सत्संगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंत्र?

आग लागली तपासाचा धूर दिसेना?