बाब्बो विराट खूपच आक्रमक निवृत्त होताच अजिंक्य रहाणे काय बोलून गेला?

अजिंक्य रहाणेंनी नुकतीच सर्व फॉरमेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर आता त्यांनी एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी बऱ्याच मुद्यांवर चर्चा केलेली पाहायला मिळाली.

अजिंक्य रहाणेने नुकतीच आपल्या निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीनंतर आता त्याने एक मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये त्याने भारतीय क्रिकेट संघाबद्दल मनमोकळेपणाने आपले मत व्यक्त केले आहे. (formats) त्याने टीम इंडिया, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली खेळण्याबद्दल आणि सध्या गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली खेळण्याबद्दल आपले विचार मांडले. तो सध्या यूकेमध्ये ‘हंड्रेड लीग’मध्ये समालोचन करत आहे. त्याने ‘स्टिक टू क्रिकेट’ पॉडकास्टवर मायकल वॉन, अॅलिस्टर कूक, फिल टफनेल आणि डेव्हिड लॉईड यांसारख्या दिग्गजांशी संवाद साधला. या दरम्यान आता अजिंक्यने विराट कोहलीच्या कसोटी कर्णधारपदाबाबत एक विधान केले आहे.

रहाणेने स्पष्ट केले की, माझे विराट कोहलीसोबत सकारात्मक आणि मोकळे संवाद होत असत, (formats) ज्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये आमच्यात महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. जेव्हा जेव्हा मी कोहलीसोबत फलंदाजी करायचो, तेव्हा मी सर्वोत्तम कामगिरी करायचा. विराटचा दृष्टिकोन आक्रमक होता आणि माझा शांत स्वभाव दोघांसाठीही उपयुक्त ठरला. विराट नेहमी मला आक्रमक खेळण्यासाठी प्रोत्साहित करायचा आणि म्हणायचा की, जर पहिला चेंडू फटका मारण्यासारखा असेल, तर मी तसे करावे आणि तो मला पाठिंबा देईल.”

रहाणेने 85 कसोटी सामन्यांमध्ये 12 शतकांसह 5077 धावा केल्या आहेत. त्याच्या कर्णधारपदाखाली भारताने एकही कसोटी सामना गमावला नाही. 2020-21 मध्ये, जेव्हा कोविड-19 महामारीच्या काळात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला, तेव्हा रहाणेने संघाला विजय मिळवून दिला. ॲडलेडमध्ये भारताचा संघ 36 धावांवर सर्वबाद झाला. महामारीच्या प्रादुर्भावामुळे पहिल्या कसोटीनंतर कोहली भारतात परतला. त्यानंतर रहाणेने संघाची सूत्रे हाती घेतली आणि भारताला 2-1 असा विजय मिळवून दिला.

रहाणे म्हणतो की, 2014 मध्ये जेव्हा महेंद्रसिंग धोनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला, तेव्हा विराट कोहली आणि रवी शास्त्री या जोडीने सूत्रे हाती घेतली. (formats) त्यांनी भारतीय क्रिकेटला मजबूत केले. परदेशात खेळताना त्यांनी आक्रमक आणि धाडसी क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. अजिंक्य रहाणेंनी बराच काळ संघात पुनरागमन होईल अशी वाट पाहिल्यानंतर अखेर निवृत्तीची घोषणा केली.

हेही वाचा :

पंकजा मुंडेंना पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर राजकारणात खळबळ?

व्यसनमुक्त असणाराच खरा सत्संगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंत्र?

आग लागली तपासाचा धूर दिसेना?