कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासन विभागाचे काम काय? ते कसे चालते? ते लोकांच्या आरोग्याशी कसे संबंधित आहे? या प्रश्नाची उत्तरे महाराष्ट्राला या विभागाचे प्रमुख तुकाराम मुंढे यांनी अधिक तपशिलासह आणि समाधानकारक दिलेली आहेत. त्यांनी सुरू केलेल्या धडक कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. खाद्य आस्थापनातील मंडळी त्यांना आणि त्यांच्या कारवाईला घाबरू लागले आहेत. सामान्य माणसाची प्रतिक्रिया मात्र”यहाँ तो डरना जरुरी है”अशा स्वरूपाची आहे.अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेल्या तुकाराम मुंढे यांनी त्यांच्यासमोर असलेल्या खडतर परिस्थितीला आव्हान देत भारतीय प्रशासकीय सेवेपर्यंत धडक मारली. कायद्याच्या आणि व्यवस्थेच्या चौकटीत राहून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करायचे असे ध्येय ठरवून त्यांनी आपल्या कामाशी इमान ठेवले. (Food and Drug) त्यांची काम करण्याची पद्धत संबंधित आस्थापनातील व्यवस्थेला कायम अडचणीची ठरली आणि म्हणूनच ते कोणत्याही विभागात एक वर्षापेक्षा अधिक काळ राहू शकले नाहीत. सर्वाधिक वेळा बदली झालेले अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेच्या इतिहासात त्यांची नोंद घेतली जाईल.

तुकाराम मुंढे ज्या विभागात जातात तो विभाग प्रसिद्धीच्या झोतात येतो. त्या विभागाच्या कामकाजाची माहिती सामान्य माणसाला मिळते. त्या विभागात काम करणाऱ्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ते त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देतात. तुम्ही मंडळींनी तुमचे काम चोख बजावले, तर सर्व सामान्य माणूस तुमच्या कामाबद्दल कधीही तक्रार करणार नाही. असे ते नेहमीच सांगत असतात. अन्न आणि औषध प्रशासन या विभागाची कार्यालये राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आहेत. सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी ही कार्यालये असून सुद्धा सामान्य जनता मात्र तेथील कामकाजाबद्दल कालपर्यंत अनभिज्ञ होती. हे कार्यालय कशासाठी आहे, त्याचे काम काय, याची माहिती सामान्य जनतेला नव्हती. (Food and Drug) आता मात्र या अन्न आणि औषध प्रशासनाचे राज्यप्रमुख यांनी तुकाराम मुंढे सूत्रे हाती घेतल्यानंतर हा विभाग सामान्य माणसांना समजू लागला आहे.
तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईची उच्च न्यायालयाने दखल घेतली आणि शासकीय कार्यालयातील उपहारगृहे आणि तेथील स्वच्छता याची सुद्धा पाहणी करा असे न्यायालयाने सुचवल्यानंतर तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या विधानभवनातील उपहारगृहाची झाडाझडती घेण्यात आली. तेथे कमालीची अस्वच्छता आढळून आली. मुंबईत श्रीमंत लोकांच्या खाद्य संस्कृतीसाठी ओळखले जाणारे काही क्लब आहेत.
हे प्रतिष्ठित क्लब प्रतिष्ठित लोकांच्यासाठी आहेत. या क्लब मधील किचन रूम कमालीची अस्वच्छ आढळल्यानंतर या क्लबजचा परवाना निलंबित केला गेला आहे. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातील काही मोठ्या बेकरीजवर मुंडे यांच्या कार्यालयाने धाडी घातलेल्या आहेत. अय्यंगार बेकरी, अन्य काही बेकरीज अन्न व औषध प्रशासनाच्या रडारवर आलेल्या आहेत आणि बेकरी प्रॉडक्ट विकणाऱ्या दुकानांना लावण्यात आले आहे.
कोल्हापुरातील काही बेकरींना सील ठोकण्यात आले आहे.
बेकरी फूड, तसेच खाद्य पदार्थ, विशेषतः दुग्धजन्य पदार्थ, यावर मुंढे यांनी लक्ष केंद्रित केले आहे. दुधाचा अंश नसलेली पनीर विक्रीसाठी प्रतिबंधित केली गेली आहेत. तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईमुळे अनेक सकारात्मक बदल दिसून येऊ लागले आहेत. खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर पदार्थांवर जाळ्या दिसू लागल्या आहेत. हॉटेल वाल्यांनी तर धसकाच घेतला आहे. भोजन सेवा देणाऱ्या हॉटेल्स मध्ये आता भोजन बनवणारे ड्रेस कोड दिसू लागले आहेत. स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष दिले जाऊ लागले आहे. मद्य तयार करणाऱ्या काही कारखान्यांकडे तुकाराम मुंढे यांची वक्रदृष्टी वळली आहे. (Food and Drug) काही नामवंत मद्य ब्रँडमध्ये भेसळ होत असल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्यांनी या मद्य विक्रीवर बंदी घातली आहे. एकूणच खाद्य संस्कृतीमधील मक्तेदारांच्या मध्ये भीती निर्माण झाली आहे. आणि अशा प्रकारचे भीती असलीच पाहिजे अशी लोक भावना आहे.
हेही वाचा :
इचलकरंजीतही धावणार पंतप्रधान ई-बस १० बसेस लवकरच दाखल, यंत्रणा उभारणी गतीने?
सांगली बलात्कार व लूटप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी?