महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता?

8 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता कायम राहणार आहे. कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. (Maharashtra) त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनीही हवामानाची स्थिती लक्षात घेऊन काळजी घेणे आवश्यक आहे.

मराठवाड्यातील हवामानात पुन्हा बदल होण्याची चिन्हे आहेत. छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांच्या काही भागांत 8 ऑगस्टला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra) त्याचवेळी जालना , परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये पावसासोबत मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो. हवामान विभागाने या भागातील नागरिकांना बदलत्या वातावरणाबाबत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.मराठवाड्यात पावसाच्या सरी येताना वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता आहे. काही भागांत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, त्यामुळे वादळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः वीज चमकत असताना नागरिकांनी मोकळ्या जागेत थांबणे टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या पाच जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे , नंदुरबार , जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. याशिवाय नाशिकच्या घाटमाथ्यावर तसेच अहिल्यानगर परिसरातही हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात. जळगाव आणि नाशिकमधील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज असून, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नाशिक घाटमाथ्यासह संबंधित परिसरासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.कोकणातील पालघर , ठाणे , मुंबई , रायगड , रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे दिवसभर ढगाळ वातावरण राहू शकते आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra) काही ठिकाणी मेघगर्जनेसह सरी येऊ शकतात; मात्र या भागातील कोणत्याही जिल्ह्यासाठी विशेष अलर्ट नाही.

हेही वाचा :

इचलकरंजीतही धावणार पंतप्रधान ई-बस १० बसेस लवकरच दाखल, यंत्रणा उभारणी गतीने?

सांगली बलात्कार व लूटप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी?

 शिराळ्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा सहाजणांना चावा?