सैनिक टाकळीत कडकडीत बंद, निषेध फेरी?

जयसिंगपूर प्रस्तावित एमआयडीसीला विरोध करणाऱ्या माजी सैनिक आणि शेतकऱ्यांवर आमदार यड्रावकर यांच्या समर्थकांनी जयसिंगपुरात हल्ला केला आहे. (soldiers) या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सैनिक टाकळी (ता. शिरोळ) गाव बंद ठेवून ग्रामस्थ, माजी सैनिक आणि महिलांनी गावातील प्रमुख मार्गावरून भव्य निषेध फेरी काढली.

दरम्यान, आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांच्यासह माजी सैनिकांनी सैनिक टाकळी येथील एमआयडीसी रद्द होण्यासाठी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर रविवारी रात्रीपासून ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. सैनिक टाकळी येथे प्रस्तावित असलेल्या एमआयडीसीविरोधात गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. (soldiers) यावर तोडगा काढण्यासाठी जयसिंगपूर येथील श्री सिद्धेश्वर देवालयात झालेल्या मारहाणीच्या प्रकरणामुळे याचे पडसाद उमटले.

निषेध फेरीत सकल मराठा समाजाचे अमर पाटील, संभाजी ब्रिगेडचे विकास पाटील, हनुमंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विजय पाटील, महादेव पाटील, सतीश सावंत, सुरेश गोते, आत्माराम पाटील, राजेश पाटील, शामराव पाटील, अशोक पाटील, रणजित पाटील, सुहास पाटील, सोपान पाटील यांच्यासह शेकडो माजी सैनिक, शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व व्यवहार बंद; घटनेचा निषेध प्रस्तावित एमआयडीसीला विरोध करण्यासाठी सोमवारी शिरोळ तालुक्यात बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. (soldiers) याला सैनिक टाकळी परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळी सैनिक टाकळी गावातील सर्व दुकानदारांनी व व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवून या घटनेचा निषेध केला. त्यानंतर गावातून निषेध फेरी काढली.

हेही वाचा :

कोल्हापुरात लिंगायत समाजाचा एल्गार?

नागरिकांनो सावधान पेट्रोल भरताना झिरोसोबत दोन गोष्टी तपासा?

सर्वसामान्यांना झटका साखरेचे दर टक्क्यांनी वाढले?