श्रावणाच्या उंबरठ्यावर दरवाढ झाल्याने उपवासासाठी खिशाला झळ?

सांगली व्रत वैकल्य, उपवासाचा महिना असलेला श्रावण महिना गुरूवार पासून सुरू होत असतानाच उपवासाचे पदार्थ २० ते ३० टक्क्यानी महागल्याने यंदाचा उपवास खिशालाही कात्री लावणारा ठरणार आहे. श्रावणी सोमवार, गोकूळ अष्टमी, नारळी पौर्णिमा हे श्रावणातील महत्वाचे उपवासाचे दिवस झाल्यानंतर (Shravan) अगदी गणपती, दसर्‍यातील नवरात्र हे उपवास असल्याने दर वाढल्याने उपवासही महाग ठरणार आहेत. श्रावण महिन्यापासून पितृपक्षातील पंधरा दिवस वगळले तर नवरात्रीपर्यंत उपवास करणारे अनेक आहेत.

गेल्या आठवड्यापर्यंत ७० रूपये किलोने मिळणारा शाबू आता ८० रूपये प्रति किलोवर पोहचला आहे, तर १४० ते १५० रूपये किलो असलेला भगर म्हणजेच वरीचे दर किलोला २०० रूपयापर्यंत पोहचले आहेत. राजगिरा १२० रूपये किलोने विकला जात होता त्याचे दर आता १५० ते १६० रूपये किलो झाले आहेत. तर १६० ते १७० रूपये किलो असलेले खाद्य तेल आता १९० रूपये किलो झाले आहे. १४० रूपये किलोने मिळणारा शेंगदाणा १६० रूपये किलोवर पोहचला आहे. (Shravan) यामुळे यंदाच्या श्रावणातील उपवासही महागडा ठरणार आहे.

संस्कृती आणि परंपरा अनेक घरात श्रावण महिन्यात उपवास करण्यात येतो. मांसाहार पूर्णपणे वर्ज करून श्रावण महिन्यात बहुसंख्य कुटुंबात देवकार्याचे आयोजन करण्यात येते. यासाठी उपवास महत्वाचा मानला जातो. विशेषता महिला वर्ग या महिन्यात अधिक उपवास करतात. काही जण श्रावणात दिवसातून एकवेळ जेवण करण्याचे म्हणजे एकभुक्त राहण्याचे व्रत करतात.

श्रावणातील सर्व सोमवारी उपवास करण्याची अनेकांची प्रथा आहे. तर शनिवार आणि कुलस्वामीचा वार म्हणून रविवारी उपवास केला जातो. श्रावणानंतर गणेशोत्सव आणि पंधरा दिवसाचा पितृपक्ष वगळल्यानंतर नवरात्र अशी उपवासाची जंत्रीच या काळात असते. आषाढी एकादशीपासूनच उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढती असते. (Shravan) यंदा तामिळनाडूमध्ये शाबू कंदाचे अपेक्षित उत्पादन न झाल्याने शाबूची उपलब्धता कमी आहे. शाबूची दरवाढ झाल्याने अन्य पदार्थाचेही दर वाढले आहेत.-महेश फुटाणे, पार्वती प्रोव्हीजन, मिरज.

हेही वाचा :

पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठा बदल? सर्वसामान्याचं टेन्शन वाढलं?

ट्रम्प टॅरिफमुळे महाराष्ट्र राज्यासमोर नवे आव्हान?

मिरज पंचायत समितीत अधिकाऱ्यांना कोंडले?