अभिजीत दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीने मोठा धमाका केला. (Abhijit Deepke) पहिल्याच आंदोलनात त्यांनी केंदीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. मात्र, आता अभिजीत दिपके यांना मोठा झटका बसल्याचे बघायला मिळतंय.

जंतर मंतरवर मोठे आंदोलन जेनझींचे सुरू होते. या आंदोलनाचा परिणाम असा झाला की, थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. या आंदोलनात जेंनझी रस्त्यावर उतरले. शेवटी जेनझींपुढे सरकारला झुकावे लागले. कॉकरोच जनता पार्टीला मोठे यश मिळाले. कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले की, ते सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लढतील. लोकांच्या संपर्कात राहतील आणि लोकांच्या मुद्द्यावर काम करतील. मात्र, यादरम्यान त्यांनी राजकीय पार्टीबद्दल भाष्य केले नाही. आता अभिजीत दिपके यांना मोठा दणका बसला आहे. स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस यांनी मोठी घोषणा केली. रिपोर्टनुसार, चंद्र कुमार बोस यांनी आजाद हिंद पार्टीच्या नावाने आपला नवीन पक्ष सुरू केला, तशी घोषणा त्यांनी केली. (Abhijit Deepke) त्यांच्या म्हणण्यांनुसार, या पार्टीत पूर्ण Z युवक आणि नेताजी यांच्या विचारधारेवर पार्टी असेल. चंद्र बोस यांनी नुकताच एक मुलाखत दिली. त्यांनी म्हटले की, स्वातंत्र्याच्या 80 नंतर युवकांना रस्त्यावर उतरावे लागले. त्यांना एका चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनात युवकांची भावना बघितली. शिक्षण, आरोग्य आता भ्रष्टाचाराचे नवीन केंद्र बनले आहे.
सर्व राजकीय पक्ष यात आहेत. देशातील युवांना या गोष्टींचा विट आला. त्यांना त्यांच्या अधिकारासाठी लढायचे आहे. नेताजींची आजाद हिंद सैना आणि आजाद हिंद पार्टीच्या नावाखाली अजून यापेक्षा काय चांगले होऊ शकते. यासोबतच त्यांनी दावा केला की, त्यांचा पक्ष सर्वसमावेशक, धर्मनिरपेक्ष,प्रगतीशील विचारधारा असलेला पक्ष असेल, युवकांसाठी मोठे व्यासपीठ असणार आहे.चंद्र कुमार बोस यांच्या राजकीय प्रवासात अनेक चढउतार बघायला मिळाली आहेत. बोस 2016 मध्ये भाजपामध्ये दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, पार्टीने वचन दिले होते की, ते नेताजींचे विचारांचा प्रचार करतील. (Abhijit Deepke) त्यानंतर त्यांनी भाजपा सोडली. 2026 मध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान त्यांनी तृणमूल कांग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी ममता बनर्जी यांच्याकडे राजीनामा दिला.
हेही वाचा :
पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठा बदल? सर्वसामान्याचं टेन्शन वाढलं?