कोल्हापूर अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात सुरू असलेल्या जतन-संवर्धनाच्या कामावरून हिंदुत्ववादी संघटना आणि मंदिर जतन-संवर्धन कृती समितीने घेतलेल्या आक्षेपांवर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, प्रशासनाकडून ही बैठक अचानक रद्द झाल्याने समितीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आवारातच ठिय्या आंदोलन केले. (meeting) दरम्यान, यानंतर झालेल्या चर्चेदरम्यान समितीचे कार्यकर्ते आणि जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यात जोरदार शाब्दीक खडाजंगी झाली.

पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वहाने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित राहू शकणार नसल्याने बैठक रद्द करण्यात आल्याचा निरोप समितीला दुपारी देण्यात आला. मात्र, बैठक होणारच, अशी भूमिका घेत कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्यावेळी अग्निवीर भरतीची बैठक आणि त्यानंतर मंत्रालयातील व्हिडीओ बैठक सुरू असल्याने भेटीस विलंब झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या आवारात ठिय्या मांडल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. (meeting) यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, दिलीप देसाई, ॲड. बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, विजय देवणे, प्रसन्न मालेकर, श्रीपूजक गजानन मुनिश्वर, अभिजित पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
सतत भांडणाचा सूर नको बैठक रद्द केली आहे, टाळलेली नसून पुढील तारीख देण्यात आली आहे. (meeting) सर्व संबंधित अधिकारी उपस्थित असताना आक्षेपांच्या मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे. मात्र, प्रत्येकवेळी या विषयावरून भांडण आणि वाद होणे योग्य नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी समिती सदस्यांना सुनावले.
हेही वाचा :
पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठा बदल? सर्वसामान्याचं टेन्शन वाढलं?