कार-मोपेडच्या धडकेत कोल्हापुरातील महिला डॉक्टर ठार

शिरोळ तालुक्यातील जांभळी येथे एक मे रोजी सकाळी झालेल्या भीषण अपघातात हरोली येथील डॉक्टर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्नेहल विजय उपाध्ये (वय ३०, रा. हरोली) असे मृत डॉक्टरचे(doctor) नाव असून त्या नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या दवाखान्यात जात असताना त्यांच्या मोपेडला भरधाव चारचाकीने जोरदार धडक दिली.

ही घटना सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली. डॉ. स्नेहल(doctor) उपाध्ये या मोपेडवरून जांभळी मार्गे प्रवास करत असताना तानाजी रणखांबे यांच्या घरासमोर भरधाव वेगात आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या मोपेडला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, डॉ. उपाध्ये या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर चारचाकी वाहनचालक सूर्यकांत आण्णा कुरडे हा घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच शिरोळ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून कारवाई सुरू केली. याप्रकरणी अभिजित कांतिनाथ ऐनापुरे (रा. हरोली) यांनी शिरोळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांनी अशा घटनांपासून बचाव करण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा :

सोन्याच्या दरात पुन्हा झाली घसरण, चांदीचे भावही नरमले! 

इतका राग…भर मैदानातच कर्णधार शुभमन गिलची पंचांशी दोनदा बाचाबाची Video

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; एप्रिल महिन्याचा हप्ता ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार