जम्मू-कश्मीर : पहलगाम हल्ल्यातील फरार आरोपींचा भारतीय तपास यंत्रणांकडून तपास सुरू आहे. घटनास्थळापासून ३० किलोमीटरच्या परिसरातच ते दहशतवादी लपल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. हल्ल्याचा(attack) मास्टरमाइंड हशिम मुसासह इतर दहशतवादी आता कश्मीरमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे दहशतवादी कश्मीच्या घनदाट डोंगरांमधील गुफांमध्ये लपल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तसेच, या दहशतवाद्यांकडे काही दिवसांचाच अन्नसाठी शिल्लक राहिल्यामुळे त्यानंतर अन्नासाठी ते बाहेर पडतील, त्यावेळी त्यांना घेरण्याची योजना तपास यंत्रणांकडून राबवली जाणार आहे. तपास यंत्रणांकडून २४ तास त्यांचा शोध घेतला जात आहे.
एका माहितीनुसार पाकिस्तानच्या काही हँडलरकडून या दहशतवाद्यांना(attack) कश्मीरच्या बाहेर काढण्यासाठी स्थानिक लोकांशी संपर्क साधण्यात आला आहे. पण भारतीय सैन्याकडून सुरू असलेल्या शोध मोहिमेमुळे त्या लोकांना बाहेर पडण्यात अडचणी येत आहेत. सैन्याच्या शोधमोहिमेमुळे त्या दहशतवाद्यांना पकडण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय दहशवाद्यांची शोधमोहिम आणि सैन्याचे ऑपरेशन पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आले आहे.
दहशतवाद्यांना पकडण्यासाठी इस्त्रायलच्या तपास यंत्रणांचीही मदत घेतली जात आहे. आयएसआय कडून पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाइंड हाशिम मुसाला कश्मीच्या बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. हाशिम मुसा सैन्याकडून मारला गेल्यास किंवा पकडला गेल्यास पाकिस्तानची मोठी नाचक्की होणार आहे. तसेच पाकिस्ताना आणि दहशतवादाचे कनेक्शनही उघड होणार आहे.
दहशतवाद्यांनी वापरलेला सॅटेलाइट फोन संदर्भातील माहिती मिळवली जात असून, या तपासासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांवरून, हा हल्ला लश्कर-ए-तैयबा या संघटनेने आयएसआयच्या सूचनेवरून रचला होता. पहलगाम परिसरात २० एप्रिलनंतर वापरले गेलेले सर्व मोबाइल नंबर आणि कॉल डेटा तपासणीखाली आहेत.

दहशतवादी(attack) अनंतनाग जिल्ह्याच्या हद्दीत लपून बसल्याचा विश्वास तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. तेथील जंगलांतील गुफा त्यांच्या लपण्याच्या सुरक्षित ठिकाणी ठरल्या आहेत. त्यांच्या जवळ १५ ते २० दिवस पुरेल इतका अन्नसाठा असल्याचे समजते. हा साठा संपल्यानंतर, अन्नअभावी त्यांना जंगलाबाहेर यावे लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हाशिम मुसा आणि त्याच्यासोबत हत्याकांडात सहभागी असलेल्या दहशतवादी एक दिवस आधीच बैसरनमध्ये दाखल झाले होते का, याचा तपास सध्या सुरक्षा यंत्रणा करत आहेत. या दहशतवाद्यांची रेखाचित्रे आणि छायाचित्रे सार्वजनिक करण्यात आली असून, त्यांच्याशी साम्य असलेल्या काही संशयितांची उपस्थिती स्थानिकांनी नोंदवली आहे. या पार्श्वभूमीवर, तपास यंत्रणांनी २१ एप्रिल रोजी बैसरन भागात असलेल्या घोडेस्वार, रेस्टॉरंट चालक तसेच इतर सेवा पुरवणाऱ्या नागरिकांची चौकशी केली आहे.
हेही वाचा :
कार-मोपेडच्या धडकेत कोल्हापुरातील महिला डॉक्टर ठार
इतका राग…भर मैदानातच कर्णधार शुभमन गिलची पंचांशी दोनदा बाचाबाची Video
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; एप्रिल महिन्याचा हप्ता ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार