कोल्हापूर वित्त आयोगाच्या निधी वाटपात भेदभाव शिरोळ पंचायत समितीसमोर १५ ऑगस्टला महिला सदस्यांचे बेमुदत उपोषण?

शिरोळ पंचायत समितीमधील विरोधी गटातील महिला सदस्यांनी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी वाटपात सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव केला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. (Shirol) पंचायत समितीच्या मासिक बैठकीगमध्ये सत्ताधारी सदस्यांनी स्वाभिमानी व कॅाग्रेस आघाडीच्या सदस्यांना १५ वा. वित्त आयोगाचा निधी द्यायचा नाही असा ठराव केला आहे. या अन्यायाविरोधीत उद्या शनिवारी, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजल्यापासून शिरोळ पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा महिला सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जास्मिन यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

महिला सदस्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंधराव्या वित्त आयोगाचा निधी हा गावची लोकसंख्या आणि इतर निकषांवर आधारित वितरित केला जातो. त्यामुळे या निधीचे सर्व घटकांमध्ये समान वाटप करणे हा कायदेशीर भाग आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा कोणत्याही कायद्यात सत्ताधारी अथवा विरोधक असा भेदभाव करण्याची तरतूद नाही. (Shirol) तसेच यापूर्वी कधीही अशा प्रकारे निधी वाटपात भेदभाव झाला नव्हता, याकडेही सदस्यांनी लक्ष वेधले आहे.यावेळी पंयाचत समितीच्या विरोधी गटातील महिला सदस्यांनी सन २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या आर्थिक वर्षांच्या पंधराव्या वित्त आयोगाचे विकास आराखडे तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. निधी वाटपाची वस्तुस्थिती समोर यावी यासाठी हे आराखडे मागवण्यात आले आहेत.

येत्या दोन ते तीन महिन्यांत शिरोळ तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यास विकासकामे मोठ्या प्रमाणावर लांबणीवर पडण्याची किंवा त्यांना विलंब होण्याची शक्यता आहे. निधी वाटपातील दिरंगाई आणि आचारसंहिता यामुळे शिरोळ तालुक्यातील सामान्य जनता पायाभूत सुविधांपासून वंचित राहील, अशी भीती महिला पंचायत समिती सदस्यांनी व्यक्त केली आहे. तालुक्यातील यड्रावकर गटाकडून निधी वाटपात होत असलेला हा अन्याय सहन केला जाणार नाही, (Shirol) अशी भूमिका घेत महिला सदस्यांनी थेट १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनीच सकाळी ११ वाजल्यापासून आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे शिरोळ तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.यावेळी पंचायत समिती सदस्या नीलम म्हेत्रे , दीपाली होगले , ज्योती कांबळे , राजश्री माणकापुरे यांच्यासह शिरोळ तालुक्यातील कॅाग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

माजी खासदार राजू शेट्टींच्या ‘स्वाभिमानी’ला जाग, आता ‘एकला चलो’चा नारा?

आधी वादावादी नंतर कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर कामाबाबत समिती स्थापन करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय?

कोल्हापूर विमानतळ धावपट्टी विस्तारणार कधी?