अवघ्या सात हजारांच्या कर्जाच्या बदल्यात दीड लाखांच्या व्याजासाठी विवाहित महिलेला सावकारीच्या जाळ्यात अडकवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सर्जेराव कुंभार, उज्ज्वल बळीराम दोरुगडे (दोघे रा. लक्ष्मीमाळ, कबनूर) आणि विनायक पवार या तिघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (Woman) याची तक्रार पीडित महिलेने दिली आहे.

पतीचा अपघात झाल्यानंतर पिडीत महिलेने उज्ज्वला दोरुगडे हिच्याकडून सात हजार रुपये उसने घेतले होते. ही रक्कम मुदतीत परत देऊनही दीड लाख रुपये व्याजासाठी संशयितांनी तगादा लावला होता. (Woman) त्यातूनच सर्जेराव कुंभार या संशयिताने हॉटेलमध्ये पीडितेला जबरदस्तीने कामास ठेवले. उज्ज्वला व सर्जेराव या दोघा संशयितांनी तिला अपमानास्पद वागणूक दिली. उज्ज्वला हिने पीडितेला घरी बोलावून जबरदस्तीने ग्राहकासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. तिसरा संशयित विनायक पवार याची उज्ज्वला हिने ओळख करून दिली. पवार याने ग्राहक पाठवून तसेच तारदाळ रोडवरील एका लॉजवर पाठवून पीडितेला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले व पैसे उकळले. संशयित महिलेने स्वत:चे घर कुंटणखाना म्हणून वापरण्यास दिल्याचा आरोपही पीडितेने फिर्यादीत केला आहे. पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड (Woman) यांनी तपासाबाबत सूचना दिल्या. तिघेही संशयित पसार असून त्यांचा शोध सुरू आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नेहमी वावर असणार्यांचा शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत वावर होता. मध्यरात्री ३.३० च्या सुमारास याबाबत तक्रार दाखल झाली. पोलिस ठाण्यात बंद खोलीत चर्चेनंतर काहींची नावे गुन्ह्यातून वगळल्याची चर्चा होती.
हेही वाचा :
आंबे खाल्ल्यानंतर दोन बहीणींचा मृत्यू