MI vs CSK : एका पराभवासह मुंबईसोबत काय काय झालं? सीएसकेने इतिहास बदलला

आयपीएलच्या रंगतदार सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला हरवले वर ऐतिहासिक विजय मिळवत स्पर्धेत आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करत 208 धावांचे मोठे आव्हान उभे केले आणि (MI vs CSK) त्यानंतर मुंबईचा डाव अवघ्या 103 धावांत गुंडाळत तब्बल 100 पेक्षा अधिक धावांनी विजय मिळवला.

या सामन्यातील सर्वात मोठा ठसा उमटवला तोसंजू सॅमसन याने. त्याने शानदार नाबाद 101 धावांची खेळी करत चेन्नईच्या डावाला भक्कम आधार दिला. विशेष म्हणजे, मुंबईविरुद्ध चेन्नईकडून शतक झळकावणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. (MI vs CSK) त्याच्या या खेळीमुळेच चेन्नईला मोठी धावसंख्या उभारता आली.प्रत्युत्तरात मुंबईचा डाव सुरुवातीपासूनच डळमळीत झाला. चेन्नईच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत एकामागोमाग एक विकेट्स घेतल्या आणि मुंबईला सावरण्याची संधीच दिली नाही. अखेर 19 ओव्हरमध्येच मुंबईचा संपूर्ण संघ 103 धावांवर बाद झाला. ही धावसंख्या मुंबईची चेन्नईविरुद्धची सर्वात नीचांकी ठरली असून, वानखेडेवर चेन्नईविरुद्ध पहिल्यांदाच मुंबई ऑलआऊट झाली.

या पराभवाने अनेक विक्रम मोडले गेले. चेन्नईसाठी 100 पेक्षा अधिक धावांनी मिळवलेला हा पहिलाच विजय ठरला, (MI vs CSK) तर मुंबईसाठी इतक्या मोठ्या फरकाने झालेला हा पहिलाच पराभव आहे. या निकालामुळे स्पर्धेतील समीकरणेही बदलली असून, मुंबईच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .या मोसमात मुंबईला आधीच काही पराभवांना सामोरे जावे लागले होते आणि या पराभवाने त्यांची अडचण आणखी वाढली आहे. तर दुसरीकडे चेन्नईने या दमदार विजयासह आत्मविश्वास उंचावला असून, पुढील सामन्यांसाठी मजबूत संदेश दिला आहे.

हेही वाचा

राहुरी-बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांचं भवितव्य ठरणार

लग्नासाठी अल्पवयीन मुलीचं अपहरण, हात-पाय बांधून जिल्हा परिषदेच्या शाळेत डांबलं अन् महाराष्ट्राला हादरवणारी घटना

पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचे लेटेस्ट रेट