आता अघोषित बहिष्कार युद्ध

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : ऑपरेशन सिंदूर भाग एक आणि भाग दोन च्या माध्यमातून भारताने पाकिस्तानचे थोबाड चांगलेच रंगवल्यानंतर, काही अटी आणि शर्थी लादून शस्त्र संधी जाहीर केली. अघोषित युद्धामध्ये(war) पाकिस्तानला अगदी उघडपणे पाठिंबा जाहीर करणाऱ्या तुर्कीस्तान आणि अजरबैझान या दोन देशांना त्यांच्यावर अघोषित बहिष्कार टाकून मोठा आर्थिक तडाखा दिला जातो आहे. या दोन देशांच्या अर्थकारणावर त्याचा मोठा प्रतिकूल परिणाम होणार आहे.

तुर्कस्तान आणि अझर बैझान या दोन देशांशी भारताचे व्यापारी संबंध आहेत. या दोन देशांशी आयात निर्यात व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत असतात. विशेषतः तुर्कस्तान आणि अजरबैझान या दोन देशांमध्ये भारतीय पर्यटक मोठ्या संख्येने जात असतात. तुर्कस्तानातून भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर फळे येतात. त्यामध्ये तुर्की सफरचंदांचा समावेश आहे. केवळ पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही हजार कोटी रुपयांची सफरचंद येत असतात. यावरून संपूर्ण देशामध्ये तुर्कस्तानच्या सफरचंदाची किती आवक होत असेल याची कल्पना केलेली बरी.

भारत पाचच्या अघोषित युद्धामध्ये(war) तुर्कस्तान सरकारने पाकिस्तानला जाहीर पाठिंबा दिलाच शिवाय पाकिस्तानच्या समुद्रात एक युद्ध नौकाही धाडली होती. भारतावर हल्ला करण्यासाठी शस्त्रास्त्रे पाठवली होती. त्यामध्ये ड्रोनचा समावेश होता. त्यांच्या ड्रोनचा भारताने चक्काचूर केला हा भाग वेगळा. तुर्कस्तानच्या या कृतीबद्दल भारतामध्ये विशेषतः व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

पुणे येथील व्यापाऱ्यांनी तुर्कस्तानची फळे विशेषतः सफरचंद विकण्यास नकार दिला. इतकेच नाहीतर शेकडो कोटी रुपयांची सफरचंदाची आवक थांबवली. तुर्कस्तानची सफरचंदे विकत घेण्यास ग्राहकांनीही नकार दिला. त्याचा मोठा झटका तुर्कस्तानला बसला आहे आणि इथून पुढेही बसणार आहे. पुणे येथील व्यापाऱ्यांच्या या अघोषित बहिष्कारनंतर पुण्यातील फळ विक्रेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या पाकिस्तानातून येऊ लागलेल्या आहेत. यावरून किती मोठा झटका बसला आहे हे लक्षात येते. भारत आणि तुर्कस्तान मध्ये 13.8 अब्ज डॉलरचा व्यापार होतो. आता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण होणार आहे. तुर्कस्तानच्या अर्थकारणावर त्याचा गंभीर परिणाम होणार आहे.

फळ आयातीवर निर्बंध घातल्यानंतर भारतातील मोठ्या ट्रॅव्हल्स एजन्सी नी तुर्कस्तान आणि अझरबैझान येथील नियोजित सहली रद्द केलेल्या आहेत. या दोन देशांमध्ये भारतामधील किमान तीन कोटी लोक पर्यटनासाठी जात असतात(war). आता पर्यटनच बंद करण्याचा यात्रा कंपन्यांनी निर्णय घेतल्यामुळे या दोन देशातील हॉटेल्स आणि बाजारपेठ यावर प्रतिकूल परिणाम होणार आहे. याचे प्रत्यक्ष परिणाम दिसू लागल्यानंतर या दोन्ही देशांच्या राज्यकर्त्यांची अवस्था “घी देखा, लेकिन बडगा नही देखा” अशी होणार आहे.

तुर्कस्तान कडून भारत इंधन आयात करतो तथापि इंधन घेण्यासाठी इतर अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे भारताकडून इंधन खरेदी अप्रत्यक्षपणे बंद केली जाईल. जो आर्थिक फटका तुर्कस्तानला बसणार आहे तोच दणका अझरबेजानला सुद्धा बसणार आहे. या दोन देशांनी अघोषित युद्धामध्ये पाकिस्तानला समर्थन दिले असले तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा मात्र पाकिस्तानला झालेला नाही. त्याचबरोबर भारतापुढे आपली शस्त्रे फुसकी ठरली याचेही दुःख तुर्कस्तानला होणार आहे.

ज्या देशाला भारताने सर्व प्रकारची मदत दिली होती, वाहतुकीसाठी एक विमानही दिले होते, संरक्षणासाठी सैन्य पुरवले होते, त्या मालदीव देशाने भारताशी गद्दारी केली. भारतीय सैन्याला माघारी पाठवले. भारताच्या तुलनेत करंगळीच्या नखा इतका असणारा मालदिव देश हा भारतीय पर्यटकांच्यावर चालत होता. पर्यटन या व्यवसायावर या देशाचे अर्थकारण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एका कृतीने मालदीव या देशाचे कंबरडे मोडले.

नरेंद्र मोदी यांनी मालदीव पेक्षाही अत्यंत नितळ समुद्र आणि निसर्ग सौंदर्य असलेल्या भारतीय किनाऱ्यावर एक दिवसाची सैर केली. त्याचे फोटो सेशन व्हायरल केले. मालदीवला जाण्यापेक्षा भारतीय किनारे किती स्वच्छ नितळ आणि निसर्ग समृद्ध आहेत हे नरेंद्र मोदी यांनी या फोटोसेशन मधून सांगितल्यानंतर, किंवा तसा संदेश जगभर पोहोचवल्यानंतर मालदीवचा पर्यटन व्यवसाय पूर्णपणे कोलमडला.

भारतीय यात्रा कंपन्यांनी तेथील नियोजित आरक्षणे रद्द केली. त्या देशाशी असलेला पर्यटन व्यवसाय या यात्रा कंपन्यांनी थांबवला. त्याच्या गंभीर परिणामांना त्या छोट्या देशाला सामोरे जावे लागले. भारतावर अवलंबून असलेला पर्यटन व्यवसाय अडचणीत आला तर देश दिवाळखोरीत जाईल याची कल्पना तेथील मुजोर अध्यक्षाला आली. त्यानंतर नरमाईचे धोरण स्वीकारले तथापि त्याचा काहीही उपयोग झाला नाही. भारतीय पर्यटकांनी मालदीवकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. आता अशाच प्रकारचा धक्का तुर्कस्तान आणि अझरबैझान या दोन देशांना बसला आहे, आणि अनिश्चित काळापर्यंत तो बसणार आहे.

हेही वाचा :

सोन्याच्या दराच पुन्हा घसरण! चांदीच्या किंमतीत घट

मोठी बातमी! मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश!

भयंकर! बापाचं राक्षसी कृत्य, पोटच्या २ लेकींवर ६ महिने बलात्कार